आरोग्य व शिक्षण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र कांकरीया व सल्लागारपदी डॉ. दीपक शहा यांची निवड

Spread the love

चिंचवड :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने पुणे जिल्हा समितीचे अध्यक्षपदी प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे मानद प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांची तर, संकुलाचे संस्थापक सचिव व पिंपरी चिंचवड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने माजी अध्यक्ष डॉ. दीपक शहा यांची पुणे जिल्हा मा. अंनिसच्या मुख्य सल्लागार पदी निवड करण्यात आली. सदर निवड 3 वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. याप्रित्यर्थ प्रतिभा महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी समवेत प्राध्यापक शिक्षकेत्तर सेवक वर्गांनी अभिनंदन केले.

ऑनलाईन झालेल्या बैठकीत 47 सदस्यांनी सहभाग नोंदविला त्यात सर्वांनुमते खालील जिल्हा कार्यकारिणी निवडली गेली. या बैठकीस पुणे, पिंपरी चिंचवड,निगडी, चाकण, राजगुरूनगर, बारामती, आर्वी, भोर, शिरूर, इंदापूर शाखेतील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळीजिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण भापकर (बारामती), कार्याध्यक्ष श्रीराम नलावडे (पिंपरी चिंचवड), प्रधान सचिव नारायण कर्पे (चाकण), कार्यवाह युवा विभाग सुजित चव्हाण (भोर), वार्तापत्र विभाग सुभाष सोळंकी (पिंपरी चिंचवड), वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प भारत विठ्ठलदास (इंदापूर), बुवाबाजी संघर्ष भगवान काळभोर, सांस्कृतिक विभाग नामदेव पडदुणे (चाकण), महिला विभाग पार्वती कदम (तळेगाव ढमढेरे) मानसिक आरोग्य विभाग अनुराधा काळे (पुणे), विविध उपक्रम विभाग सुरेश सपकाळ (पुणे), कायदा विभाग अ‍ॅड. श्रीकांत ठाकूर (पुणे), जातीअंत विभाग/ जोडीदाराची विवेकी निवड, राजु जाधव (पिंपरी चिंचवड), प्रशिक्षण विभाग डॉ. हेमंत चिखलीकर सोशल मीडिया विभाग कृतार्थ शेवगावकर (पुणे), जिल्हा सल्लागार समिती रघुवीर तुपे (हडपसर), दिनकर साळुंखे (पिंपरी चिंचवड), राज्य सल्लागार सदस्य डॉ. अरुण बुरांडे, विश्वास पेंडसे.राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, विविध उपक्रम राज्य सदस्य धनंजय कोठावळे (भोर), सांस्कृतिक विभाग राज्य सदस्य मनोहर शेवकरी (चाकण), कायदे विभाग राज्य सदस्य अ‍ॅड. साधना बाजारे, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प राज्य सदस्य राहुल माने या मान्यवरांची जिल्ह्यातील राज्य कमिटी सदस्याच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!