ताज्या घडामोडी

दै. सोमेश्वर साथी च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दै.सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार 2022 साठी आवेदन पत्र पाठविण्याचे आवाहन

Spread the love

परळी, (प्रतिनिधी )
सामान्य माणसाला स्वातंत्र्य,समता, बंधुता, सामाजिक न्यायाची शिकवण व व्यक्तीहिता सह राष्ट्रहिताला प्राधान्य देत सक्षम माणूस घडविणारा संस्कार देणारे लोकप्रिय दै.सोमेश्वर साथी,परळी वैजनाथ जिल्हा बीड.येथून प्रकाशित होणार्‍या
दै सोमेश्वर साथी च्या वर्धापन दिनानिमित्त दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी दै.सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार- 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षी प्रमाणे या ही वर्षी कला, क्रीडा, उद्योग, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, संगीत,अशा विविध जीवनक्षेञात विशेष योगदान देणार्‍या व्यक्ती,संस्थांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा दै.सौमेश्वर साथी चे संपादक बालासाहेब फड यांच्या संकल्पनेतून साकारला आहे.
वृतपञाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे हे एक अग्रगण्य दैनिक. समाजात विधायक कार्य करणार्‍या व्यक्तींना, संस्थांना सन्मानित करण्याच्या हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योजक अरुण मराठे तर स्वागताध्यक्ष एकता चे संस्थापक अध्यक्ष अजमत खान असणार आहेत.
सदरील सोहळा परभणी येथे मान्यवरांचे उपस्थितीत व शुभहस्ते संपन्न होणार असून लोकजीवनात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तीं आणि संस्थांनी आपले आवेदन पत्र पर्पल नाईन इंटरटेनमेंट स्टुडिओ मासूम कॉलनी दर्गा रोड परभणी या पत्त्यावर केलेल्या कार्याचे फोटो,बातमी काञणा सह बायोडाटा दि.15 नोव्हेंबर 2022 पर्यत पाठवावा असे आवाहन मुख्य संयोजक बालासाहेब फड ,एकता चे परभणी जिल्हाध्यक्ष प्रा.अरुण पडघन यांनी केले. अधिक माहिती साठी बालासाहेब फड 8669049918 अजमत खान यांचेशी मोबाईल 7721088557 नंबर वर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!