ताज्या घडामोडी

प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांची अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या कार्यकारिणीवर बिनविरोध निवड

Spread the love

रयत शिक्षण संस्थेच्या हुपरी येथील चंद्राबाई शांतप्पा शेंदुरे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्रोफेसर आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांची मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाली. शिवाजी विद्यापीठातुन एकमेव अर्ज आल्याने परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी मा. प्रा. सुभाष दगडे, जालना यांनी बिनविरोध निवड घोषीत केले आहे. दिनांक ५,६,७नोव्हेंबर २०२२ रोजी जालना येथे मराठी अर्थशास्त्र परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.

मराठी अर्थशास्त्र परिषद ही अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना आहे
वर्षातून एकदा अधिवेशन भरते आर्थिक प्रश्न व सामाजिक प्रश्नावर चर्चा होते व विचार मंथन होत असते.
पुढील तीन वर्षासाठी परिषदेच्या कार्यकारिणीवर प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

डॉ. इंगळे गेली पंचवीस वर्षे परिषदेला सतत उपस्थित राहत असून त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांना परिषदेचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सर्वोत्तम ग्रंथ पारितोषिक’ मिळाले आहे. त्यांच्या शोधनिबंध, व आर्थिक, सामाजिक लेख, संशोधन ग्रंथाना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सुमारे 30 पारितोषिके मिळाली आहेत.

प्रत्येक विद्यापीठातून एक प्रतिनिधी परिषदेच्या कार्यकारिणीवर निवडला जातो. डॉ. इंगळे यांना शिवाजी विदयापीठ कक्षेतून राष्ट्रीय कार्यकारिणीवर काम करण्याची संधी मिळाली आहे, त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!