आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पदवीधर, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी डॉ. दिपक शहा यांनी पुढाकार घ्यावा ः डॉ. प्रेमचंद बाफना

लायन्स क्लबच्या जगभरात  46 हजार शाखामधून सुमारे 14 लाख सदस्य कार्यरत आहेत. संचालक ला. द्वारका जालन..

Spread the love

पदवीधर, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी डॉ. दिपक शहा यांनी पुढाकार घ्यावा ः डॉ. प्रेमचंद बाफना..

आवाज न्यूज,: गुलामअली भालदार, चिंचवड 08 ः

चिंचवड येथील प्रतिभा ग्रृप ऑफ इन्स्टिट्युटचे संस्थापक सचिव व लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा यांना शैक्षणिक तसेच, ग्रामीण भागातील शाळांना संगणक, गोरगरीब, दारिद्रय रेषेखालील नागरिकांना डोळ्यांच्या इस्पितळाची उभारणी, वृद्धाश्रम, मतीमंद मुलांच्या आश्रमांना आर्थिक वस्तूरुपी मदत आदी आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात गेली 36 वर्षे सातत्याने सक्रीय सहभाग घेत लायन्स क्लबच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल लायन्स क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष ॲलेक्झेन्डर डग्लस यांनी घेवून त्यांची निवड लायन्स क्लबच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार ‘ॲम्बेसडर ऑफ गुडविल ॲवॉर्ड’ क्लबचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक लायन डॉ. प्रेमचंद बाफना यांच्याहस्ते मेडल देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लबचे माजी मल्टीपल कौन्सिल चेअरमन द्वारका जालन, प्रथम उपप्रांतपाल ला. परमानंद शर्मा, द्वितीय उपप्रांतपाल सुनिल चेकर, आजी-माजी पदाधिकारी ला. हेमंत नाईक, ला. रमेश शहा, ला. श्रीकांत सोनी, ला. भारती चव्हाण, ला. शरदचंद्र पाटणकर, ला. सी.डी. शेठ, ला.डॉ. अनिल तोष्णीवाल, ला. चंद्रा शेट्टी, लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष ला. मयूर राजगुरव, महिला अध्यक्षा ला. राजश्री शहा, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, एम.बी.ए. चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्हाडे, डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस समवेत पुणे जिल्ह्यातील लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य महाविद्यालाचे प्राध्यापक, शिक्षक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे डॉ. प्रेमचंद बाफना आपल्या मनोगतामध्ये पुढे म्हणाले, डॉ. दीपक शहा यांनी आपला व्यवसाय सांभाळून लायन्स क्लबच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात गरजू, वंचित, निराधार उपेक्षित, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्तरावर भरीव कामगिरी मानवतेच्या भूमिकेतून गेली 36 वर्षे अविरत करीत आहे. सन 2006 साली चिंचवड येथे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटची स्थापना करून अत्यंत अल्पावधीतच गुणवत्तापूर्वक शिक्षण विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाद्वारे देत आहे. आज 7500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे ही, अभिमानास्पद कामगिरी ते पार पाडीत आहे. याच शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख रोजगार उपलब्ध कसे देता, यासाठी प्लेसमेंट यंत्रणा यशस्वीपणे पार असली तरी शहरातील पदवीधर गरजू विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशिल रहावे, असे त्यांना आजच्या मंगलसमयी आवाहन देखील करीत आहे. कारण आज पदवीधर विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे., परंतु त्यांच्या हाताला काम अपेक्षेप्रमाणे मिळत नाही, अशी खंतही यावेळी डॉ. बाफना यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात लायन्स क्लबचे माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन व विद्यमान संचालक ला. द्वारका जालन प्रास्ताविकात म्हणाले, लायन्स क्लबच्या जगभरात  46 हजार शाखामधून सुमारे 14 लाख सदस्य कार्यरत आहे. लायन्स क्लब स्थापनेचा मुळ उद्देश ज्या समाजात आपण शिकलो मोठे झालो. त्या समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला जातो. गरजूंना सहकार्य करून त्यांचे जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न आरोग्य, सामाजिक, शिक्षण आदी क्षेत्रात लायन्स क्लबच्या माध्यमातून जो लायनीझमच्या माध्यमातून तन, मन, धनानी समाजपयोगी भरीव कार्य केले आहे., अशांची निवड क्लबचे इंटरनॅशनलचे अध्यक्ष अलेक्झेंडर डग्लस यांच्या स्वाक्षरीने होते. जगभरात 25 ते 30 जणांचीच निवड त्यांच्याकडून होते. यावर्षी डॉ. दीपक शहा यांची निवड त्यांनी ॲम्बेसेडर ऑफ गुडविल ॲवॉर्डसाठी केली, ही कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे. डॉ. दीपक शहा यांचे नेतृत्व, कतृत्व, दातृत्व व वकृत्व या चौफेर अंगानी ते कार्य करीत असतात. विविध समाजपयोगी सेवांमध्ये भरीव ठसा उमठविला आहे. यावेळी अनेकांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी आदी देवून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. दीपक शहा व त्यांनी पत्नी प्रतिभा शहा यांच्याहस्ते समाजलक्षी संघटनांना भरीव आर्थिक मदत धनादेश स्वरूपात देण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. दीपक शहा म्हणाले, आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब व महाविद्यालयातील गुरूजनांचे मान सन्मानाचे मी आभार मानतो. क्षेत्र कोणतेही असो छोट्या छोट्या गोष्टीतूनच माणूस घडत असतो. सहकार्यांरचे प्रामाणिक साथ देखील महत्वाची असते. पुरस्कार समारंभाचे नियोजनात प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट चे हितेन करानी, मुख्याध्यापिका सविता टॅ्रवीस लायन्स क्लबचे प्रशांत शहा, सुभाष राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!