आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

दुधिवरेखिंड ते पवनानगर मार्ग बनला मृत्यूचा साफळा ;आधी बस दुर्घटना टळली , आज झाड कोसळून मार्ग बंद..

स्वातंञ्यदिनी बस दुर्घटना टळली , आज झाड कोसळून मार्ग बंद झाला ; पण दुधिवरे ग्रामस्थांनी आणि कुसगाव येथील कार्यकर्त्यांनी झाड जेसीबी लावून बाजूला करण्यात आल्यावर वाहतूक सुरळीत झाली

Spread the love

दुधिवरेखिंड ते पवनानगर मार्ग बनला मृत्यूचा साफळा ;आधी बस दुर्घटना टळली , आज झाड कोसळून मार्ग बंद..

आवाज न्यूज:  मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.२० प्रतिनिधी

दुधिवरेखिंड ते पवनानगर मार्ग बनला मृत्यूचा साफळा बनला आहे.ता.१५ आॕगष्ट रोजी एक मिनीबस भाजेतील रस्त्यावरून लोहगड आणि घेरेवाडीतील रस्त्याने दुधिवरेखिंड मार्गे पवनाधरणाकडे जात असताना घेरेवाडीतील पहिल्या वळणावर उतरून दुसऱ्या वळणावर गाडी चालकाने ब्रेक न लागल्याने सरळ दरीत जाताना झाडाचे खोडावर घातली. सुमारे ३८ प्रवासी अत्यंत धोक्याचे ठिकाणी बसमधे अडकलेले माहिती समजताच भाजे व लोहगड चे ग्रामस्थांनी बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला.

या बसमधील काही लोक आॕटोरिक्षाने लोणावळा येथे गेले. त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत रिक्षाचालकास प्रकार सांगितला .
यापूर्वी काही वर्षापूर्वी भाजेतील एक ट्रॕक्टर ट्राॕलीचे आपघातात तीनजण जागीच ठार झाले होते , तर लोहगड येथील ऊरूसावरून परतत असलेल्या टेंपोचा आपघात होऊन त्यात सात लोक मरण पावले होते , तर कित्येक लोक जखमी झाले होते.

आज दुधिवरेखिंड मधून पवनाधरणाकडे जाणाऱ्या आरूंद व खड्डेच खड्डे असलेल्या व खडी वाहून गेलेल्या रस्त्यावर बाजूला असलेल्या मुळ्या उघड्या पडलेल्या झाडांनी जमीन सोडून खाली रस्त्यावर कोसळल्या .त्यामुळे सायंकाळी सहा ते साडेसहा सात पर्यत वाहतूक बःद झाली होती..कुसगाव येथे एका जेसीबी चालकाने येऊन झाडे बाजूला केल्याने दुधिवरे , आंबेगाव , शिंदगाव , पवनानगरला जाणाऱ्या वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला..

स्वातंञ्यदिनी बस दुर्घटना टळली , आज झाड कोसळून मार्ग बंद झाला ; पण दुधिवरे ग्रामस्थांनी आणि कुसगाव येथील कार्यकर्त्यांनी झाड जेसीबी लावून बाजूला करण्यात आल्यावर वाहतूक सुरळीत झाली. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने रस्त्याची दुरूस्ती , करून अपघाताची शक्यता आसणारे दगडगोटे , दरडी काढाव्यात व मार्गावर अडथळे ठरणाऱ्या झाडे , वेली यांना तोडावे , अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!