ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले घवघवीत यश

Spread the love

मुरूम, ता. १० (बातमीदार) : येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील इयत्ता पाचवी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी मालनबी उस्मान उडचणे ही पात्र ठरली. तर इयत्ता आठवीतील तीन विद्यार्थीनी पात्र झाल्या आहेत. यामध्ये साखरे श्रद्धा दयानंद, कांबळे सरस्वती महादेव, कांबळे अश्विनी महेश असून या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी डॉ. वंदना जाधव यांनी विशेष परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले. तर पाचवी वर्गाला पवार शरयू व रुपचंद ख्याडे यांनी मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक घाटवाले नुरअहमद यांच्या हस्ते बुधवारी (ता. ९) रोजी प्रशालेत सत्कार करण्यात आला. यावेळी ख्याडे रूपचंद, कुनाळे महादेव, कडते ब्रह्मानंद, पाटील स्वप्निल, हरी शेके, बालाजी गायकवाड आदींची उपस्थिती होती. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुंडू पुराणे. डॉ. गिरीश मणियार यांनीही या यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष सत्कार करून अभिनंदन केले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील प्रशालेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक घाटवाले नुरअहमद यांच्या हस्ते करताना सहशिक्षक व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!