ताज्या घडामोडी

पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने जयगड पंचक्रोशीतील नागरिक आणि त्यांच्या JSW पोर्ट, JSW एनर्जी रत्नागिरी लिमिटेड, चौगुले पोर्ट या उद्योग धंद्यांच्या समस्यांबाबत एक समन्वय बैठक संपन्न

Spread the love

दिनांक ०८/११/२०२२ रोजी दुपारी ३.३० चे सुमारास JSW पोर्ट जयगडच्या कार्यालयात मा.ना.श्री.. उदयजी सामंत साहेब. मा. मंत्री उद्योग खाते महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने जयगड पंचक्रोशीतील नागरिक आणि त्यांच्या JSW पोर्ट, JSW एनर्जी रत्नागिरी लिमिटेड, चौगुले पोर्ट या उद्योग धंद्यांच्या समस्यांबाबत एक समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनातर्फे या सभेला रत्नागिरी जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीगण उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्ष रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सन्मा. श्री. एम. देवेंदरसिंग साहेब होते, तर त्यांचे समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. धनंजय कुलकर्णी साहेब, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चव्हाण. प्रांताधिकारी श्री. विकास सूर्यवंशी साहेब तहसीलदार श्री. शशिकांत कांबळे साहेब, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे जयगड बंदर निरीक्षक श्री. महानवर JSW पोर्टचे प्रमुख श्री. दवे, अधिकारी श्री. सुदेशजी मोरे, श्री. सचिनजी गबाळे हे उपस्थित होते. मा. ना. श्री. उदयजी सामंत यांचे स्वीय सहाय्यक श्री. भास्करराव पाटील साहेब ग्रामस्थांपैकी श्रीमती फरजाना डांगे सरपंच जयगड ज्येष्ठ शिवसैनिक, माजी सरपंच जयगड श्री. अनिरुद्ध साळवी, उपसरपंच श्री. अमेयजी परकर, श्री. अनिल कांबळे, शाखाप्रमुख श्री. नारायणशेठ काताळकर, श्री. कमलेश बापट, श्री. हर्षद जोग, श्री. प्रसाद गुरव, श्री. राजेंद्र जाधव सरपंच साखरमोहल्ला, श्री. सुहास सावंत असे शिष्टमंडळ उपस्थित होते. मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या समक्ष पुढीलप्रमाणे समस्यांना मांडण्यात आले.

१)सडेवाडी गणेश विसर्जन घाट याठीकाणी जाण्यायेण्यासाठी कायमस्वरूपी पक्का रस्ता JSW पोर्ट कडून बांधून मिळून तो ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात यावा.

२) श्रीदेव कऱ्हाटेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करणे.

३) खोय विहीर कुंपण घालून, डागडुजी दुरुस्ती करून नागरिकांना वापरण्यायोग्य करून मिळणे.

४) कंपनीमधील कामगाराना पगारवाढ मिळणे.

५) जयगड पंचक्रोशीतील गावांसाठी स्वतंत्र ११ KV ट्रान्सफॉर्मर सह सुविधा मिळणे. (याबाबत पूर्वीचा पत्रव्यवहार मा. जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करावयाचा आहे.)

महाराष्ट्र शासनाच्या सुमारे ३ एकर मोकळ्या जागेवर तलाव खोदण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य मिळावे तसेच JSW उद्योग समुहाचेसुद्धा सहकार्य मिळावे.

७) जयगड निवळी रस्ता असुरक्षित आणि नादुरुस्त आहे, सध्या डागडुजी चालू आहे. या रस्त्यावर

कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात यावी . ( यासाठी ३ प्रमुख कंपन्यांनी योगदान द्यावे असे

मा. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले) ८) जयगड निवळी रस्त्यावरून धोकादायकरित्या सुरु असलेल्या LPG TANKER वाहतुकीबाबत

तक्रार करण्यात आली

९) या भागातील विविध उद्योगधंद्यांच्या उभारणीमुळे नियोजित विकासकामांसाठी परिसरातील ९ ग्रामपंचायतींचे घर बांधणीसाठी परवानगी देण्याचे अधिकार MMB बंदर खाते यांचे कडे दिले आहेत. ते पूर्ववत ग्रामपंचायतीकडे देण्यात यावेत.

१०) मे. चौगुले कंपनीचे जयगड खाडीत सुरु असलेले ड्रेजिंगच्या कामामुळे जयगड, साखरमोहल्ला गावांतील नागरिकांच्या घरांना तडे गेले आहेत. यावर उपाययोजना करण्यात यावी.

११)दिनांक ०७/११/२०२२ पासून जयगड खाडीमध्ये कोळसा आयात सुरु झालीय. ती बंद करण्यात यावी.

१२)परिसरातील ३ उद्योगसमूहामध्ये स्थानिक युवक युवतीना नोकरी धंद्यात प्राधान्य देण्यात यावे. १३) साखरबौध्दवाडी स्मशानभूमीचाप्रश्न सोडविण्यात यावा.

१४) मार्च २०२३ पर्यंत सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली सुरु होवून नांदिवडे ग्रामस्थांचा त्रास दूर करावा.

१५) कुणबीवाडी रस्त्यालागत कोळश्याची भुकटी उडून त्रास होतो. सदर शेड चे पत्रे उडाले आहेत. ते तात्काळ बसवून घ्यावेत.

१६)JSW प्रकल्पाच्या जवळपासच्या गावात PPM युनिट्स (प्रदूषण मापक यंत्रे) बसविण्यात यावीत.

१७) सध्या बॉटम अश साठवून ठेवलेले साठे धोकादायक आहेत. जल, भूमी प्रदूषण होत आहेत. याचा बंदोबस्त करण्यात यावा.

१८) साखरबौद्धवाडी भागातील नागरिकांची पुरातन विहीर व या विहिरीकडे जाणारा पूर्वापार रस्ता JSW प्रकल्पाच्या मुख्य रस्त्यामुळे विभाजित झाला आहे. यावर उपाययोजना करण्यात यावी.

वरीलप्रमाणे मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांतर्फे सर्वश्री अनिरुद्ध साळवी, कमलेश बापट, प्रसाद गुरव, राजेंद्र जाधव आणि श्रीमती फरजाना डांगे यांनी सहभाग घेतला. सर्व चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाली . मा. ना. श्री उदयजी सामंत साहेब मा. मंत्री उद्योग खाते महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या मार्गदर्शन आणि आदेशानुसार सदर बैठक पार पडल्यामुळे सर्व ग्रामस्थ आश्वस्त झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!