ताज्या घडामोडी

तालुका स्तरीय गीत गायन स्पर्धेत दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे प्रथम

Spread the love

स्वरचैतन्य संघटनेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची ओढ निर्माण व्हावी तसेच शालेय शिक्षणाबरोबरच संगिताची बिज रुजावी यासाठी तालुका स्तरीय समुह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत लहान गटात दि मॉडेल इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यामध्ये
स्वरांगी प्रशांत सुर्वे
आस्था विश्वजित शेटये
सानवी रमेश भिंगार्डे
नक्ष विक्रांत पावरी
अनय अभिजित शेटये
चैतन्य अभिजित शेटये
या विद्यार्थ्यांचा समावेश होता.राष्ट्रीय कलाकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. श्री गिरीष पांचाळ ,संदेश पांचाळ आदींनी या स्पर्धेचे नियोजन केले. या स्पर्धा आबलोली येथे पार पडल्या. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री विनोद पेढे यांनी मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक विलास कोळेकर व मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!