ताज्या घडामोडी

सांगली जिल्ह्यातील १७व१८ नोव्हेंबरला ऊसतोड बंद आंदोलनासाठी वाळवा तालुक्यातील हुतात्मा व राजारामबापू सहकारी साखर कारखान्याना निवेदन

Spread the love

इस्लामपूरः प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील १७व१८ नोव्हेंबरला ऊसतोड बंद आंदोलनासाठी वाळवा तालुक्यातील हुतात्मा व राजारामबापू सहकारी साखर कारखान्याना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव अँड. एस्. यु. संन्दे जगन्नाथ भोसले उपस्थित होते
यावेळी बोलताना भागवत जाधव पुढे म्हणाले की ऊस उत्पादकाला एकरकमी एफ्आरपी केंद्र सरकारने सरकारने साखर कारखान्याच्या विरोधी धोरणात्मक निर्णयच्या विरोधात केंद्र सरकाराचे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवस लक्षणीय ऊसतोडणी बंद आंदोलने स्वाभिमानी शेतकरी संघटनेन पुकारले आहे. मा.खा राजु शेट्टी यांनी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. साखर आयुक्त डॉ शेखर गायकवाड यांनी एकरकमी एफ्आरपी चा कायदा मंत्रीमंडळाच्या कँबिनेट मध्ये मंजूर होणे गरजेचे आहे. दुसरी मागणी वजनातील काटेमारी आँनलाईन करावी ही तात्काळ मागणी मजुर करून तात्काळ आँनलाईन कारवाई सुरू केली.केंद्र सरकारने साखरेचा भाव ३१०० रुपये वरुन३५०० रुपये प्रति क्विंटल भाव करावा.ऊसतोड महामंडळाने ट्रक्टर धारकांना मंजूर पाठवण्याची जबाबदारी घ्यावी. तरच शेतकऱ्यांच्या प्रतिटन १० रुपयाची वर्गणी घ्यावी त्यामुळे टोळी फसवणूक होणार नाही. इथेलाँनचे दर ८० रुपये प्रतिलिटर करावे. या सह विविध मागणीसह साखर कारखान्याला निवेदन देण्यात आले
यावेळी भागवत जाधव,अँड एस्. यु.संन्दे,जगन्नाथ भोसले, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, शहाजी पाटील, अनिल करळे,प्रताप पाटील, भैरवनाथ कदम गणी मुल्ला सह कार्यकर्ते उपस्थित होते

कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे एकरकमी द्या
भागवत जाधव म्हणाले की अजूनही सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यानी अडमुठेपणा सोडुन कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे एकरकमी द्या अन्यथा होणाऱ्या उग्र आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था जबाबदारी साखर कारखान्याची राहिल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!