ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत निवडणूक माध्यमातून विरोधकांना एकीची ताकद दाखवण्याची संधी – आमदार मानसिंगराव नाईक

Spread the love

शिराळा प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांना एकीची ताकद दाखवण्याची नामी संधी कार्यकर्त्यांना आली आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
शेडगेवाडी येथील समर्थ मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, कार्यकर्त्यांनी समन्वयातून उमेदवार निवडावेत. आम्हांला हस्तक्षेप करण्याची संधी देऊ नये.जातीचे दाखले पडताळणी करून तयार ठेवावेत. अचूक अर्ज भरावेत. त्रुटींमुळे अर्ज बाद होणार नाही याची काळजी काळजी घ्यावी. गावच्या हिताचा विचार करून शक्यतो निवडणूक बिनविरोध करण्यावर भर द्यावा. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायत निवडणूकां महत्वाच्या आहेत. गाफील राहू नका. विरोधकांच्या बुध्दीभेदाला बळी पडू नका. उमेदवारीत युवा वर्गाला संधी असावी.
यशवंतचे अध्यक्ष नाईक म्हणाले, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगभाऊ यांची एकत्रित ताकद दाखवून द्यावी. सर्व ठिकाणी दारुन पराभव हेच विरोधकांना उत्तर ठरेल. कार्यकर्त्यांनी कांही झाले तरी सर्व ग्रामपंचायतीवर आपल्या विचारांचा झेंडा फडकविला पाहिजे. मतभेद झाल्यास विरोधकांना फायदा होईल असे वागू नका. सर्व ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवा.
जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले, सर्वांनी एकदिलाने काम करावे. आपसात मतभेद नकोत. आपल्यातील मतभेदाचा फायदा विरोधकांना होईल, असे वागू नका. गावचे हित व विकास साधतील असे उमेदवार निवडा.
बैठकीस रोहित व भूषण नाईक, बिऊरचे सरपंच सुखदेव पाटील, विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, संभाजी पाटील, सुहास घोडे-पाटील, कोंडीबा चौगुले, तानाजी वनारे, माजी उपसभापती नथुराम लोहार, गजानन पाटील, शिवाजी लाड, दिनकर दिंडे, संपत जाधव, मोहन पाटील, सावळा पाटील, सदाशिव नावडे, सुरेश चिंचोलकर, विजय पाटील, शामराव नाईक, वसंत पाटील, आनंदराव पाटील, शामराव पाटील, सुधीर बाबर, लक्ष्मण पाटील, राजाराम नायकवडी, बाजीराव मोहिते, संजय नांगरे, आबासो पाटील, संदीप चोरगे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!