ताज्या घडामोडी

सोनाली नवांगुळ यांना महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)यांचा विशेष पुरस्कार.

Spread the love

प्रतिनिधी : शिराळा जि सांगली येथील सोनाली नवांगुळ हीला महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) यांचा लेखन व अनुवादकार्यासाठीचा विशेष पुरस्कार आज जाहिर झाला आहे. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ही एक अत्यंत मान्यवर संस्था आहे. ती चाळीस वर्षांहून जास्त काळ महत्त्वाचं काम करत आहे.
रंगनाथ पठारे. संगमनेर यानां साहीत्य जीवनगौरव पुरस्कार ( दोन लाख व स्मृतिचिन्ह), राजन गवस. कोल्हापूर यानां कथा व कादंबरी (एक लाख व स्मृतिचिन्ह), अनिल साबळे. मंचर (ग्रंथ पुरस्कार ललित (पन्नास हजार व स्मृतिचिन्ह), शरद बाविस्कर. नवी दिल्ली (गंथ पुरस्कार – वैचारिक व अपारंपरिक (पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह), संदेश दातार. मुंबई याना नाटय़लेखन साठी (पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह), आँल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क यानां डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार (एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह), शांताराम पंदेरे यानां दलीत आणि भुमिहीनां च्या साठी विशेष कार्या साठी (एक लाख व स्मृतिचिन्ह), प्रमोद झिंझाड यांना विधवा प्रथा निर्मुलन कार्यासाठी (एक लाख व स्मृतिचिन्ह), कुमारीबाई जमकातन गडचिरोली यानां समाजकार्य पुरस्कार (पन्नास हजार व स्मृतिचिन्ह) आणि नंदिनी जाधव. पुणे यांना समाजकार्य पुरस्कार प्रबोधन साठी (पन्नास हजार व स्मृतिचिन्ह) असे ११ जणांना जाहीर झाले आहेत.
सोनाली नवांगुळ यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला असून त्या मुळच्या शिराळा (जि. सांगली) च्या आहेत. सध्या त्या कोल्हापूर येथे स्थायिक आहेत.
हे पुरस्कार मासूम संस्था आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी टिळक स्मारक मंदिर. पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!