ताज्या घडामोडी

पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येईल, पालकमंत्री रवींद्र चव्हाण

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय पालघर “खेलों इंडिया बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र” अंतर्गत पालघर जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय दर्जाच्या बॉक्सिंग रिंगचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम,अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकताच झाले.

पालघर जिल्ह्यातील खेळाडू आणि क्रीडा प्रेमींसाठी जिल्ह्यासाठी लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडा संकुल विकसित होणार आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून डिस्ट्रिक्ट खेलो इंडिया बॉक्सिंग ट्रैनिंग सेन्टर पालघर अंतर्गत नवीन बसविण्यात आलेल्या बॉक्सिंग रिंगचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुंबई विद्यापीठाच्या बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन सुद्धा पालकमंत्री चव्हाण यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना पालक मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, खेळाचे महत्व व या संदर्भात केंद्र शासनाने खेलों इंडिया ही सुरू केलेली योजना ही केवळ प्रोत्साहनात्मक नसून खेळाडूंच्या भविष्यासाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे. तसेच त्यांनी पुढे पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त स्टेडियम उभारण्यात येईल असेही सांगितले.

पालघर जिल्हा क्रीड़ा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी प्रास्ताविक करतांना, क्रीडा संकुलात ४००मी.चा सिंथेटिक ट्रैक, जलतरण तलाव, क्रीड़ा वसतिगृह, शूटिंग रेंज व विविध खेळांचे आधुनिक मैदाने सर्व सोयीसुविधांनी युक्त असे तयार करण्यात येईल असे सांगितले. मंत्री आणि अधिकारी वर्गाने यावेळी व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल, फुटबॉल, अथॅलेटिक्स खेळासाठी सुरू करण्यात येणार्‍या सराव शिबिराच्या स्थळाची पाहणी सुद्धा केली.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावीत, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, नगराध्यक्षा उज्ज्वला काळे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे तसेच स्थानिक नगरसेवक, अधिकारी वर्ग व क्रीड़ा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खेलों इंडिया प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंचा सत्कार पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!