आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

तळेगाव दाभाडे नगरपरिषदे बिरसा मुडां जयंती उत्साहात साजरी…

बिरसा मुंडा जयंती निमित्त, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  विजयकुमार सरनाईक, यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आली.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषदे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी…

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, १५ नोव्हेंबर.

बिरसा मुंडा जयंती निमित्त, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  विजयकुमार सरनाईक, यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आली.

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी एका लहान शेतकऱ्याच्या गरीब कुटुंबात झाला. मुंडा हा एक आदिवासी समूह होता जो छोटा नागपूर पठार (झारखंड) येथे राहत होता. १९०० मध्ये बिरसाजींना आदिवासींना संघटित केलेले पाहून ब्रिटिश सरकारने त्यांना या आरोपात अटक करून 2 वर्षांची शिक्षा सुनावली.

आदिवासींनी १८ व्या शतकापासून 20 व्या शतकापर्यंत ब्रिटिश सरकार आणि भारतीय शासक, जमीनदार यांच्या विरोधात अनेक वेळा उठाव केले. एकोणिसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या आदिवासी चळवळींपैकी एक म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली झालेला मुंडा उठाव होता.याला उलगुलन (महान उठाव) असेही म्हणतात. मुंडा बंड हे झारखंडमधील सर्वात मोठे आणि शेवटचे रक्तरंजित आदिवासी बंड होते, ज्यात हजारो मुंडा आदिवासी शहीद झाले होते.’ नावाने एक अतिशय महत्त्वाचे पुस्तक लिहिले आहे.

सदर कार्यक्रमास तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे   मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी   सुप्रीया शिदे, शहाने, राऊत, रवि काळाेखे, कणसे, वाघमारे, माेरमारे, इगंळे ,शिंदे, मिसाळ, फुले, काळे, गाडे, चव्हाण, वाणी मॅडम ,  व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!