ताज्या घडामोडीदेश विदेश

संयुक्त राष्ट्र संघ ( UNO ) जागतीक पर्यावरण परिषदेमध्ये( Cop27 ) सत्नागिरीचा सुपुत्र राजस शिंदे यांचा सहभाग

Spread the love

पावस : – प्रतिवर्षी संयुक्त राष्ट्रसंघ ( युनाे ) मार्फत ग्लोबल वार्मिंगचे पर्यावरणावर होणारे परिणाम व त्याबाबत करावयाच्या उपाययोजना यासाठी घेण्यात येणारी जागतिक पर्यावरण परिषद् ( United , Natons COP 27 Confersance ) यावर्षी इजिप्त येथे संपन्न होत आहे . या परिषदेमध्ये जगातील सर्व राष्ट्राचे प्रमुख प्रतिनिधी तसेच जगभरातील पर्यावरण विषयक तज्ज्ञ अभ्यासक उपस्थित राहुन आपापल्या राष्ट्राचे पर्यावरण विषयक धोरण व त्याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना याविषयी चर्चा करून निर्णय होत असतात . विशेषतः सर्वत्र पेट्रोल डिझेल इंधनाच्या वाढत्या वापरामुळे आणि उर्जा निर्मितीसाठी करण्यात येत असलेल्या कोळशामुळे वाढणारे जागतिक तापमान व प्रदुषण कमी करण्यासाठी करावयाचे उपाय व त्यासाठी वापरावयाचे पर्याय याबाबत धोरण ठरविले जाते. गतवर्षी इटलीमध्ये झालेल्या परिषदेला प्रधानमंत्री मा . नरेंद्र मोदी यांनी उपस्तितराहून भारताचे धोरण स्पष्ट केले होते . राष्ट्रप्रमुखोबरोबरच या परिषदेला जगभरातील पर्यावरण विषयक तज्झ- अभ्यासक उपस्थित राहून पर्यावरणाची सध्यस्तीती तापमान वाढीची कारणे , भविष्यात होणारे गंभिर परिणाम व त्यापासून सृष्टिला वाचविण्यासाठी करावी लागणारी कठारे उपाययोजना व्यक्त करीत असतात अशा या जागतीक स्तरावरील अत्यंत महत्वपूर्ण परिषदेमध्य पर्यावरण विषयक अभ्यासक म्हणून सहभागी होणाची संधी आपल्या रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे गावचे सुपुत्र राजस दत्तात्रय शिंदे याला मिळाली आहे . राजस शिंदे सध्या युरोपमधील आर्यलंड येथील Technology ,University College Cork ( Ucc )
विद्यापिठात- Environment Techrology या विषयाची PhD . संशोधन करीत आहे . विशेष म्हणजे पेट्रोल , डिझेल कोळसा वैगेरे इंधनाचा अतिरीक्त वापरामुळे झालेली ग्लोबल वॉर्मिंगची भयाणक समस्या यात शेतीमधील वेस्टेज तसेच गवत यावर प्रक्रीया करून बायोरिफायनरी बायोफ्यू , बायोगॅस निर्मिती करणार्‍या बायाेरिफायनरी संबंधी संशोधन प्रकल्प / प्रोजेक्ट करीत आहे . या प्रोजेक्ट पर संशोधन करण्याकरीता आर्यलड गव्हर्नमेंटने चार वर्षांची स्कालरशिप दिली आहे . हा संशाेधन प्रकल्पा करीता निवड होणासाठी जगभरातील विद्यार्थी प्रयत्न करीत असतात त्याकरीता होणारी चाचणी मुलाखत , पूर्वीचे प्रकल्प यासर्वातुन निवड होताना जगभरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धाकरत कोकणचा सुपुत्र राजस याने आपली गुणवत्ता सिध्द करत आपली निवड केली आहे (my University College PhD). Cork ( Ucc ) 200 वर्षापूर्वी स्थापन झालेले जगातील हे आर्यलंडमधील एक नामांकीत विद्यापीठ आहे . राजस शिंदे यांचे मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे असुन वडील दत्तात्रय उर्फ नाना शिंदे हे रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रा.म्हणून कार्यरत होते . तर आजोबा अनंत नारायन शिंदे यांना महाराष्ट्र शासनाने शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारान सन्मानित केलेले आहे . १०वी पर्यतच शिक्षण रत्नागिरीतील GGPS या नामांकीत शाळेत झालेले आहे . 10 वी परिक्षेमध्ये 97 % गुण प्राप्त केले होते तर 12 वी पर्यंतचे गोगटे कॉलेजमध्ये पुर्ण केले महाविद्यालयातून पूर्ण केले . येथेच असताना त्याला संशोधनाची आवड निर्मान झाली होती आणि याकरीताच12 वी नंतर डॉक्टर इंजिनिअरकडे नवळता बेसिक सायन्स अभ्यायक्रमाकडे प्रवेश घेतला . विशेष म्हणजे 12 परिक्षेत विज्ञान विषयात मिळविलेल्या गुणाद्वारे संपुर्ण भारतातुन केवळ १७ विध्यार्थ्याना पुढील बेसिक सायन्स अभ्यासा साठी पाच वर्षाकरिता अायसर स्कालरशिप प्राप्त झाली. पुढील BSC पर्यतचे शिक्षण मुंबई येथील नामांकितकॉलेज मध्ये पुर्ण केले आणि पुढील msc पर्यंतचे शिक्षण पुण्यातील फरर्ग्यूसन कालेजमध्ये पुर्ण झाल्यानंतर पुढील M S शिक्षण युराेपमधील’ या नेदरलैंड विद्यापीठात प्रवेश घेतला पर्यावरण विज्ञान ( Enviornment Science ) अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प उपक्रम यशस्वीपणे संशोधनात्मक वृत्तीने (PhD )महाविद्यालयातून पूर्ण केली. उच्च शिक्षणासाठी यूरोपमधील विश्विविध्यापिठात प्रवेश घेतला , पर्यावरण विषयातील नाविण्यपुर्ण प्रकल्प पूर्ण केले , या उपक्रमाची दखल घेवून आर्यलंड मधील cork विध्यापिठात (phD) संशाेधन व अभ्यासक्रमाकरीता निवड करण्यात आली.पर्यावरण विषयक परिषद इजिप्त ( UCC ) विश्वविध्यापिठात् ” पहिल्याच वर्षी इजिप्त येथे संपन्न हाेत असलेल्या यां जागतिक पर्यावरण परिषदेला अभ्यासक म्हणून निवड झाली आहे . त्यामुळे रत्नागिरीतील तरुण संशोधकाला जागतीक स्तरावरील परिषदेमध्ये सहभागी होण्याची मिळालेली ही संधी माेठी कौतुकाची आणि अभिमानाची ठरली आहे . त्याच्या या वाटचाली मध्ये त्याच्या प्रामाणिक प्रयत्नाबराेबरच सर्व स्तरावरील मार्गदर्शक शिक्षक , सहकारी आणि कुटुंबियांच मिळालेल पाठबळ अत्यंत महत्वपूर्ण ठरलं आहे . राजस याच्या या उतुंग भरारीबद्दुल सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!