क्राईम न्युज

मुलासह आईचा डबक्यात बुडून दुर्दैवी मृत्यू मुलाला वाचविण्यासाठी आईने स्वतःचा जीव घातला धोक्यात

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. १८ (प्रतिनिधी) : शासकीय मागासवर्गीय निवासी शाळेलगत असणाऱ्या विठ्ठल रुक्माई मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस डबक्यात सकाळच्या सुमारास आई कपडे धुत असताना मुलगा खेळ-खेळत डबक्यात पडला. ही घटना आईच्या तात्काळ लक्षात येताच तिने मुलास वाचविण्यासाठी ती डबक्यात पडून तिने खूप प्रयत्न केला पण मुलास व स्वतःला देखील वाचवू शकली नाही. या दरम्यान त्यांना कोणीही वाचू शकले नाही. त्यात आई सोनाली संतोष घुले (वय-२५ वर्ष) व मुलगा सोहम संतोष घुले (वय-४ वर्ष) राहणार जिवाचीवाडी, ता. केज, जि. बीड येथील असून दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १८) रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडल्याचे पोलीसांनी सांगितले. मुरूमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती. अकस्मात मृत्यूची नोंद मुरूम पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सपोनि डॉ. रंगनाथ जगताप, सपोनि पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी पोलीस अंमलदार सुखदेव राठोड पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!