आरोग्य व शिक्षण

‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या पुस्तकाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रकाशन

Spread the love

पुणे : ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी लिहिलेल्या व एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनने प्रकाशित केलेल्या ‘भेदाभेद भ्रम अमंगळ : संत विचार आणि संविधानिक मूल्ये’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोमवारी पुणे येथे झाले.या पुस्तकाला सुभाष वारे यांची प्रस्तावना लाभलेली आहे.

भारतीय संविधानाने आनंदी समाजासाठी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय ही मूल्ये दिली. खरे तर ही मूलभूत मानवी मूल्ये आहेत. संतांनी याच उदारमतवादी विचारांचा पुरस्कार केलेला आहे. समाजातील जात, धर्म, पंथ, वंश, लिंग यावरून कुणालाही कमी लेखू नये. सर्वांना समनतेची वागणूक मिळावी या विचारांचा जागर संतांनी केला. त्याच मूल्यांचा संविधानामध्ये समावेश झाला, याची साध्या सोप्या भाषेत मांडणी शामसुंदर महाराज यांनी या पुस्तकात केली आहे.

यावेळी श्यामसुंदर महाराज सोन्नर, एस. एम. जोशी फाऊंडेशनचे विश्वस्त सचिव सुभाष वारे व फाऊंडेशनचे कार्यकर्ते राहूल भोसले, अमित धुमाळ, किरण पाटील आणि संतोष केंगले तसेच संविधान प्रचारक प्रविण जठार उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!