महाराष्ट्र

राज्य व परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांचे भूमकर चौकात हाल : बसथांबा उभारण्याची मागणी .

भुमकर चौकामध्ये प्रवासी हैराण बसथांबा उभारण्याची आवश्यकता

Spread the love

पिंपरी-चिंचवड : महानगरपालिकेच्यामध्ये असलेल्या भुमकर चौक लगतच एक्सप्रेस हायवे आहे. त्या एक्सप्रेस हायवे वरती दिवस-रात्र महाराष्ट्र राज्य तसेच परराज्यातील प्रवासी विनंती एसटी थांबा येथे उतरतात. परंतु येथे पूर्वी असलेल्या बस थांबा हटवण्यात आल्यामुळे  राज्य व परराज्यातून येणारे नवीन प्रवाशांना या परिसरात पिंपरी-चिंचवड मध्ये येण्यासाठी नेमका बस थांबा कोठे हे कळतच नाही.यामुळे भुमकर चौकात बसथांबा उभारावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे

या परिस्थितीचा गैरफायदा काही रिक्षाचालक घेत असून  प्रवाशांकडून मनमानी पैसे आकारले जातात. यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने नवीन बस थांबा उभारावा. तसेच येथे रात्रीच्या वेळेला एका पोलिसाची व्यवस्था करावी. यामुळे येणाऱ्या प्रवाशांना मार्गदर्शन होइल.

आता पावसाचे दिवस आहेत अनेक महिला रात्री-अपरात्री एकटा उतरतात. तर त्यांना पिंपरी-चिंचवड शहरात येण्यासाठी तेथून किमान 10 ते 12 किलोमीटरचा रस्ता पार करावा लागतो. यासाठी येथे बस असणे फार गरजेचे आहे. तसेच दिवसादेखील येथे भुमकर चौकात एक पोलिस व्यवस्था वाहतूक पोलिसांची व्यवस्था असणे गरजेचे आहे. भुमकर चौकात वाहतूक पोलीस चौकी जर दिवस-रात्र चालू ठेवली तर अनेक गैरप्रकारांना आळा बसेल असे जागृक नागरिकांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!