आरोग्य व शिक्षण

कान्हे केंद्र वगळता लोणावळ्यातील व मावळतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद..

Spread the love

लोणावळा : लोणावळ्यातील व मावळतील कान्हे केंद्र वगळता  सर्व कोरोना लसीकरण केँद्रे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. कान्हे ग्रामिण रूग्णालयात आज कोविशिल्ड वॕक्सिन उपलब्ध होणार होती. पहिला व दुसरा डोस नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडून माहिती देण्यात आली .

लसीकरण शंभर टक्के होण्यासाठी  सरकारकडून जास्तीत जास्त लसींचे डोस उपलब्ध करून गावोगावी घरोघरी देण्याचे नियोजन केल्यास लसीकरण लवकर होईल, अशी मागणी वेहेरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड , दुकानदार संतोष देवकर ,हॉटेलचालक व माजी सरपंच सचिनशेठ येवले यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!