ताज्या घडामोडी

इंग्रुळ येथे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 66 वी पुण्यतिथी बुद्ध विहार सिद्धार्थ नगर इंग्रुळ तालुका शिराळा येथे समाज प्रबोधन ग्रुप यांच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शिराळा तालुका परिट समाज अध्यक्ष रवि यादव व तालुका सचिव गणेश यादव हे प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी गणेश यादव यांनी संत गाडगे महाराजांचे विचार व आयुष्यातील प्रसंग मांडून त्यांच्या विचाराची माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी सागर जंगम सर, राजू जाधव सर, बाजीराव तोङकर सर, डॉ शंकर जद, जेष्ठ नागरीक अर्जून ढोले,आनंदा परिट, अरून नाना इंगरूळकर, फैजी संजय तमुगडे, बाळासो पाटील, जगनाथ कांबळे, जालीदर कांबळे, शंकर कांबळे, ङी के कांबळे तसेच मान्यवर उपस्थित होते. यावेळी आभार बाबासो कांबळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!