आरोग्य व शिक्षण

कामशेत येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश शिंदे यांचे निधन.

Spread the love

 निधन वार्ता : कामशेत येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश शिंदे यांचे निधन.

आवाज न्यूज : कामशेत ता.२१(प्रतिनिधी ) कामशेत येथील प्रगतीशील शेतकरी व प्रसिद्ध गाडामालक , घाटाचा राजा किताबाचे मानकरी सुरेश गणू शिंदे (वय-६६ ) यांचे आल्पशः आजाराने उपचार सुरू असताना रूग्णलयात ता.१९ रोजी सकाळी अकराचे सुमारास निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी , दोन मुलगे , एक मुलगी , भाऊ , बहिणी , सूना , नातवंडे असा परिवार आहे.
मावळ पंचायत समितीचे माजी सभापती राजाराम गणू शिंदे हे त्यांचे ज्येष्ठ बंधू होत.
कार्लाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य दिपकशेठ निवृत्ती हुलावळे यांचे ते सख्खे मामा होत.सोमवारी कामशेत येथील श्री भैरवनाथ मंदिराजवळ , इंद्रायणीनदी काठी स्मशानभूमित कै.सुरेश दादा शिंदे यांचे पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कामशेत गावावर शोककळा पसरली होती.

यावेळी कामशेतचे माजी सरपंच तानाजीशेठ दाभाडे , माजी पंचायत समिती उपसभापती शांताराम कदम , संत सेना महाराज दिंडी समाज अध्यक्ष गणपत पवार , राष्ट्रवादीचे पदाधिकारी कैलास गायकवाड , मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे संस्थापक नंदकुमार भसे , तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे. गायकवाड , श्री एकविरा कृति समितीचे संस्थापक व माजी जिल्हापरिषद सदस्य भाई भरत मोरे यांनी तसेचअनेक मान्यवरांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली. यावेळी माजी पंचायत समिती सभापती गणेश गायकवाड , मावळभूषण भजनगायक नंदकुमार शेटे , कामशेत मधील व्यापारी व मिञपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!