ताज्या घडामोडी

शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पावडे सेवानिवृत्त

Spread the love

प्रमोद पाटील

पालघर जिल्हा प्रतिनिधी दि.३१
पालघर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी विश्वास पावडे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ शनिवारी (तारीख ३१) पालघर येथील सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळाच्या सभागृहामध्ये पार पडला.

पालघर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या नवली केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती सत्कार समारंभाच्या प्रसंगी पालघर तालुका गटशिक्षणाधिकारी निमिश मोहिते यांनी सांगितले की, एक प्रामाणिक, अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून पावडे यांनी सेवा केली असून प्रशासनाची त्यांना चांगली जाण असल्याने कोणतीही माहिती तत्काळ मिळवण्यासाठी तसेच इतर कामासाठी त्यांच्या ज्ञानाचा प्रशासनाला खूप फायदा होत असे, असे सांगून सेवापूर्ती नंतरचे त्यांचे जीवन सुखी आणि निरोगी जावो अशा शुभेच्छा दिल्या. या वेळी विस्तार अधिकारी संजय वाघ, विस्तार अधिकारी अरुण पवार, पालघर जिल्हा शिक्षक भारतीचे सचिव सुनील शेलार, पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान, माजी अध्यक्ष प्रमोद पाटील, माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष संतोष पावडे, माजी गटशिक्षणाधिकारी विलास पिंपळे, प्राथमिक पतपेढीचे संचालक हरीश वैद्य, सामाजिक कार्यकर्ते यदुनाथ पाटील, सदाशिव पाटील,विनोद पाटील, नवली केंद्रातील शिक्षक, सत्कार मूर्तींचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळी आदींनी विश्वास पावडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उघड केले.

यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या विस्तार अधिकारी विश्वास पावडे यांचा संपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना विश्वास पावडे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून आपण कशा पद्धतीने मार्गक्रमण केले हे सांगून आपल्याला सहकार्य आणि मार्गदर्शन करणाऱ्यांचे ऋण व्यक्त केले. पावडे यांनी शिक्षक ते विस्तार अधिकारी अशी एकूण ३९ वर्षे ६ महिने सेवा केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश माळी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!