क्रीडा व मनोरंजन
देववाडी येथे क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण
शिराळा प्रतिनिधी – देववाडी (ता. शिराळा) येथील ‘देववाडी वॉरियर्स’ आयोजीत शरद क्रीडा मोहोत्सव ‘हाफ पिच नाईट टेनिस बॉल’ क्रिकेट स्पर्धेस सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी भेट दिली. विजेत्या संघांना बक्षीस वितरण केले. या वेळी लोकनियुक्त सरपंच शुभम खोत, शरद खोत, प्रभाकर खोत, तानाजी खोत, तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष प्रविण कोपार्डे, सहभागी खेळाडू व युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.