आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

कार्लाच्या श्रीएकविरा गडावर दर्शनासाठी व नववर्षाचे स्वागतासाठी नागरिकांनी केली प्रचंड गर्दी..

कार्लाच्या श्रीएकविरा गडावर शनिवार , रविवार आणि नववर्षाचे स्वागतासाठी जमलेल्या गर्दीमुळे हायवेला लागल्या लांबच लांब वाहणांच्या रांगा..

Spread the love

कार्लाच्या श्रीएकविरा गडावर दर्शनासाठी व नववर्षाचे स्वागतासाठी नागरिकांनी केली प्रचंड गर्दी..

कार्लाच्या श्रीएकविरा गडावर शनिवार , रविवार आणि नववर्षाचे स्वागतासाठी जमलेल्या गर्दीमुळे हायवेला लागल्या लांबच लांब वाहणांच्या रांगा..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २ जानेवारी,२०२३.

लोणावळ्यात कार्लाच्या श्रीएकविरा गडावर पौषातील शनिवार , रविवार आणि नववर्षाचे स्वागतासाठी सुमारे दीड ते दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती.नववर्षांच्या पहिल्याच दिवशी श्रीएकविरा देवीचे दर्शनास आलेल्या भाविकांकडून देवीचे गडावर , गडाचे पायथ्याशी तसेच कार्लाफाटा येथे पोलिसांना कसरत करावी लागली. नववर्षांच्या स्वागतासाठी आलेले लोकही घरी परतत असल्यामुळे भाविक भक्त व पर्यटकांना गर्दीमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता..

कार्लाफाटा ते लोणावळा दरम्यान एमआयडीसी , श्रीएकविरा पेट्रोलपंपापर्यत जड वाहनांच्या , लहान प्रवासी वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या. पुणे बाजूला शिलाटणे पर्यत वाहनांच्या राःगा तर वेहेरगावच्या रस्त्यावर येवले निवास पर्यत रांगा लागलेल्या होत्या..कार्ला गावातील महाराष्ट्र बँकेपर्यत रांगा होत्या.

कार्लाफाटा येथे पोलिस आधिकारी व कर्मचारी यांचे मनुष्यबळ कमी पडत असल्याचे पाहून कार्लांचे माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे यांनी सहकारी यांच्या मदतीने कार्लाफाटा येथीला बाजूला वाहणांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे भाविक भक्त आणि पर्यटकांची लोणावळा व कार्ला गडावरून गावी जाण्यायेण्याचा मार्ग खुला झाला.

नववर्षांच्या सेलिब्रेशन मुळे ३१डिसेंबरला राञीच्या वेळी राहिलेल्या पर्याटकांनी घरी परतण्यासाठी आज मुंबई पुणे मार्गावर गवळीवाडा नाका येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनचालकांना ञास होत होता..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!