ताज्या घडामोडी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले भारतीय स्त्री शिक्षणाच्या ज्ञानाई स्फुर्तीनायिका -प्रा वर्षा पाटील- उपासे

Spread the love

इस्लामपूर दि.”यल्लम्माला सोडलेल्या मुली देवदासी झाल्या. खंडोबाला वाहिलेल्या मुली मुरळ्या झाल्या पण सावित्रीबाईच्या विचारांची कास धरलेल्या मुली पंतप्रधान, अर्थमंत्री व राष्ट्रपती झाल्या. सावित्रीबाई फुले यांनी त्याग, समर्पण व अतुलनीय कर्तुत्व केल्यामुळेच मुलींच्या पंखात आज आकाशात झेपावण्याचे बळ आले आहे. आजच्या स्त्रीने सावित्रीबाईंच्या विचारांची पणती तेवत ठेवली पाहिजे. सावित्रीबाईंच्या मुळेच आजची स्त्री स्वतंत्र व स्वयंभू झाली आहे. त्यामुळे त्याच खऱ्या भारतीय स्त्री शिक्षणाच्या ज्ञानही होत,”असे प्रतिपादन प्रा. वर्षा पाटील- उपासे यांनी केले

त्या येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना आयोजित अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती शिक्षिका दिन व बालिका दिनाच्या कार्यक्रमांमध्ये बोलत होत्या.

“स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” या विषयावर बोलताना त्या पुढे म्हणाल्या,”महिलांच्या आयुष्यात शिक्षणाची कधीही न विझणारी ज्योत त्यांनी प्रज्वलित केली.त्यांचे संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्याला वाहिलेले होते. यामुळेच त्यांच्या जन्मदिन ‘महिला शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो”. याप्रसंगी महाविद्यालयातील
कु.सुकन्या पाटील, कु.मृणाली मोहिते, कु.उत्कर्षा बल्लाळ, कु.गायत्री कोमटे, कु.सीमा बावडे, स्वप्नाली काळे व श्रद्धा बल्लाळ या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली.

शिक्षिका दिनाचे औचित्य साधताना बी.कॉम. भाग ३च्या विद्यार्थ्यांनी एक दिवस महाविद्यालयाची कामकाज पाहिले. प्राचार्य म्हणून कु.नेहा पाटील उप प्राचार्य कु. प्रियंका माळी ग्रंथपाल म्हणून कु.सारिका सलगर यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अंकुश बेलवटकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन डॉ. राम घुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.के बी पाटील यांनी केले. प्रा. सुप्रिया कांबळे यांनी आभार मानले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महिला शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.रविराज सूर्यगंध व प्रा श्रेणिक मासाळ प्रा.निलेश डामसे यांनी केले. नॅक कॉर्डिनेटर प्रा. डॉ. स्नेहल हेगिष्टे, प्रा.डॉ. संजीवनी पाटील, ग्रंथपाल प्रा.बी. डी. खामकर डॉ अशोक मरळे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या बी.ए. व बी.कॉमच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!