ताज्या घडामोडी

कवि भारत कवितके यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांची घेतली सदिच्छा भेट.

Spread the love

भारत कवितके मुंबई कांदिवली.
बुधवार दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी मुंबई कांदिवली पश्चिम मधील कवि,लेखक,पत्रकार भारत कवितके यांनी कांदिवली पोयसर येथील भाजपा उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कार्यालयात गोपाळ शेट्टी यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी भारत कवितके यांनी त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह ” माझ्या गावाच्या दिशेने…” हा काव्यसंग्रह भेट म्हणून खासदार गोपाळ शेट्टी यांना दिला.आणि दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी पोयसर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख आतिथी म्हणून निमंत्रण दिले.यावेळी कवी संमेलन व पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या आयोजीका प्रा.आशा ब्राम्हणे उपस्थित होत्या.उत्तर मुंबई मध्ये शक्यतो मराठी कवि संमेलन सारखे कार्यक्रम फारच कमी होतात.खासदार गोपाळ शेट्टी यांनी नक्की उपस्थित राहू,असे आश्वासन दिले.यावेळी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कार्यालयात समस्या निवारणसाठी आलेल्या नागरीकांची गर्दी होती.यावेळी कवि भारत कवितके, मा.नगरसेवक चारकोप मंडळ अध्यक्ष बाळा तावडे,प्रमोद घाग,प्रा.आशा ब्राम्हणे,आर.एस.वर्मा,बाबासिंग,व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!