ताज्या घडामोडी

विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात २६जानेवारी ‘प्रजासत्ताक दिन’ उत्साहात साजरा .

Spread the love

माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.खंडाळा परिसरातील मा. डॉ.श्री. कमलाकर जोशी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कै. पांडुरंग भाऊ मांजरेकर स्मृती स्थळाचे उद्घाटन श्री.शांताराम मांजरेकर यांच्या हस्ते झाले.
वृक्षारोपण डॉ.जाधव, शाळा समितीचे अध्यक्ष श्री.शत्रुघ्न लंबे तसेच वाटद ग्रामपंचायत सदस्या सौ. आकांक्षा प्रसादे यांच्या हस्ते करण्यात आले. ई-लर्नींगचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक श्री. प्रकाश वंजोळे सर यांनी केले.
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा ,निंबध स्पर्धा, फनिगेम्स तसेच हिंदी दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, यांचे बक्षीस वितरण उपस्थित सर्व विद्यमान संस्था चालक , परिसरातील डॉक्टर्स , पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, माजी मुख्याध्यापक, ग्रामस्थ तसेच शाळेशी संबंधित सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धांमध्ये प्रथम आलेल्या तीन गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या गीतांना संगीतसाथ. श्री.धोपट सर , मोहित सर, नंदादीप जाधव सर यांनी दिली. श्री. विनित मोहित सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देस रंगिला या गाण्यावर लेझिम नृत्य केले तसेच एरोबिक्स सादर केले. इ. ९वी क या वर्गाच्या विद्यार्थीनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.
माजी विद्यार्थी दुर्वास दर्शन पाटील याने विविध स्पर्धैसाठी लागणारी बक्षिसे दिली. गणेश स्विट मार्ट , जय मातादी क्लॉथ स्टोअर्स, मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष आशिषजी भालेकर, मुख्याध्यापक श्री देशमुख सर, श्री. सुरेश चौघुले, श्री.माने सर, विरेन आढाव यांनी जिलेबी दिली तसेच संस्थेकडून सर्वांना उपमा देण्यात आला. सौ. निमा अजित विचारे,श्री. मधुकर पाष्टे, श्री. सुनील शिर्के यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाषदादा विचारे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.के. जाधव सरांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर, संस्था चालक,मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!