ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरडवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Spread the love

मुरुम, ता. २७ (प्रतिनिधी)

बेरडवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी ( ता. २६) रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतराव मंडले, भुसनी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच दशरथ मंडले, ग्रामपंचायत सदस्य धनराज वासुदेव, भीमाबाई मंडले, पोलीस पाटील काशीनाथ वासुदेव, एसआरपी करुण मंडले, शिवशंकर मंडले, सुरेश मंडले, कन्हैया भोकले, रंजितकुमार भोकले, गोपाळ वासुदेव, पत्रकार नामदेव भोसले, पंडित भोसले, वलिता वासुदेव, शिवकांता वासुदेव सर्व ग्रामस्थ माता-पालक-भगिनी आदींच्या उपस्थीतीत अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावरती बहारदार नृत्य सादर करताना इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी फिल्मी गाण्यावरती नृत्य न करता सुनिल राठोड यांनी तयार केलेल्या कवितांच्या गाण्यावरच विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. कन्नड, मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील गाण्यावर मुलांनी नृत्य सादर केले. देशभक्तीपर गाणे तसेच व्यसनापासून मुक्ती मिळावी म्हणून दारुड्याची हाल दारू पिल्यानंतर काय होते. याचे मूकनाट्य सादरीकरण करून विविध प्रकारच्या गाण्यातून पर्यावरणाचे रक्षण, समाजाचे प्रबोधन तसेच या जगात राहायचे असेल तर कसे राहिले पाहिजे, काय केले पाहिजे, कशी स्पर्धा केली पाहिजे. या सर्व गोष्टींचे या संस्कृती कार्यक्रमातून रसिकांना पाहायला मिळाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील राठोड सह याकरिता सहकार्य करणारे शाळेतील मुख्याध्यापक अनिल मुडमे, सहशिक्षक बालाजी भालेराव, युवराज चव्हाण, रंजना तांदळे आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी भालेराव तर आभार युवराज चव्हाण यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!