आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवीन समर्थ विद्यालयामध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी विनायक नितीन धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते भारतीय तिरंगा फडकविण्यात आला.

Spread the love

नवीन समर्थ विद्यालयामध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी विनायक नितीन धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते भारतीय तिरंगा फडकविण्यात आला.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २७ जानेवारी.

राष्ट्रगीत ,ध्वजगीताचे सामुदायिक गायन करण्यात आले. भारतीय संविधानाचे सामुदायिक पठण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नवीन समर्थ विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष‌. महेशभाई शहा यांनी भूषविले. यावेळी बाबासाहेब बारमुख, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी मुख्याध्यापक. भगवान शिंदे,  सीमा गावडे,  छाया मोरे आणि  नितीन धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक  रेवाप्पा शितोळे यांनी केले. तुळशीचे रोप व शाल देऊन उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांचा वापर करून भारतीय प्रजासत्ताक दिनाविषयी भाषणे केली. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले .संस्कृत आणि हिंदी भाषेतील देशभक्तीपर गीतांचे गायन करण्यात आले. विद्यालयातील शिक्षक प्रतिनिधी यांनी आपल्या मनोगतातून शाळेचा ऐतिहासिक परंपरा असलेला इतिहास सर्वांसमोर मांडला.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या नवीन समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी पुरुषोत्तम गोविंद लिमये हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक हे 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सक्रिय होते स्वातंत्र्यसमरातील विशेष कार्या बद्दल भारत सरकारने त्यांना 15 ऑगस्ट 1972 रोजी तात्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या शुभहस्ते ताम्रपट सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला त्यांना मिळालेला याचा आम्हा सर्वांस सार्थ अभिमान आहे. हा ताम्रपट यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी श्री लिमये यांची सुपुत्र डॉक्टर यांच्या सौजन्याने  संजय कसाबी यांच्या प्रयत्नातून उपलब्ध करण्यात आला .असे नवीन समर्थ विद्यालयातील आमचे अनेक माजी विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्यसम्रातील सक्रिय सहभागाचे दाखले उपलब्ध आहेत.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनायक धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे माजी मुख्याध्यापक  भगवान शिंदे यांनी आपल्या मनोगतातून माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या भौतिक विकासासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले याचा प्रारंभ त्यांनी स्वतःपासून करून विद्यालयाच्या विकासासाठी २५०००रु. निधी जाहीर केला .उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे प्राचार्य  संजय वंजारे यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. प्रभा काळे यांनी केले नवीन समर्थ विद्यालयाचे प्राचार्य  संजय वंजारे, पर्यवेक्षक  रेवाप्पा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले .नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री. संजय तथा बाळा भेगडे साहेब तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव माननीय  संतोषजी खांडगे साहेब यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!