ताज्या घडामोडी

माथाडीनी उपसले संपाचे हत्यार १ फेब्रुवारीला कामबंद आंदोलन

Spread the love

माथाडी नेते नरेंद्र पाटील
यांची जाहीर घोषणा

मुंबई- माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आता येत्या एक फेब्रुवारीला राज्यभर कामबंद ठेवण्याचा निर्धार माथाडी कामगारांनी केला आहे.हे आंदाेलन माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हाेणार असून तशी घोषणाच नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार यूनियनच्या बैठकीत केली.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे मुकादम, कार्यकर्ता यांची संयुक्त बैठक नुकतीच नवी मुंबई येथील माथाडी भवनात पार पडली.यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप तसेच जितेंद्र येवले, पोपटराव धोंडे, सुरज बर्गे, पांडुरंग धोंडे, संतोष अहिरे, अजय इंगुळकर, नाशिकचे पोटे, संभाजीराव जाधव यांची भाषणे झाली. सभेला युनियनचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते.या बैठकीत नरेंद्र पाटील म्हणाले की, सरकारकडे पाठपुरावा करूनही सरकार माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने या कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळेच आम्ही १ फेब्रुवारी रोजी एक दिवसांचा लाक्षणिक राज्यव्यापी संप पुकारला आहे.या आंदोलनामुळे एपीएमसी मार्केट देखील बंद राहणार आहे.

दरम्यान, माथाडी कामगारांच्या मागण्यांमध्ये पुर्नरचित सल्लागार समितीवर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणुक करावी,सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुर्नरचना करावी,विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन पुर्नरचित माथाडी मंडळांवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणूका कराव्यात,माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, अनुज्ञाप्तीधारक तोलणार मापाडी कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घ्यावे आदींचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!