ताज्या घडामोडी

देशाला सशक्त बनवायचे असेल तर युवकांनी वैज्ञानिक दृष्टया सक्षम बनले पाहिजे…… डॉ. महेश मोटे

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. ३ (प्रतिनिधी) 

राष्ट्रउभारणीच्या कार्याबरोबर युवकांनी स्वत: मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. आपले भविष्य आपल्याच हातात आहे. स्वतः मध्ये असलेली जिद्य, चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर यश मिळतेच. जर देशाला सशक्त बनवायचे असेल तर युवकांनी वैज्ञानिक दृष्टया सक्षम बनले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित वार्षिक युवक शिबिरात ‘ अंधश्रद्धा निर्मूलन आणि युवकांची भूमिका ‘ या विषयावर शुक्रवारी (ता. ३) रोजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर शिक्षण विकास मंडळ संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके होते. या वेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. डॉ विनायक रासुरे, डॉ. शिला स्वामी, डॉ. जयश्री सोमवंशी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संध्या डांगे, सहशिक्षक शाहूराज हुलगे, प्रा. अजिंक्य राठोड आदिंची उपस्थिती होती.      पुढे बोलताना डॉ. मोटे म्हणाले की, स्पर्धेच्या काळात शिक्षणाबरोबरच वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून गुणवत्ता, तंत्र-कौशल्ये, आत्मविश्वास वाढून स्वयमपूर्ण बनने गरजेचे आहे. स्वप्न मोठी पहा म्हणजे विकास मोठा होईल. तरुणांचे हे वय अतिशय महत्वाचे असून या वयातच चिकित्सात्मकवृत्ती निर्माण झाल्यास योग्य दिशा मिळते. जर या काळात योग्य दिशा मिळाली नाही तर आयुष्याची वाट लागते असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. सतिश शेळके म्हणाले की, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील मोजक्या शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना उदाहरणासह फरक स्पष्ट करून मार्गदर्शन केले. प्रारंभी शिवानंद भंडारे यांनी वेड पण हे तुझ सार ठेव ग बाजूला… नवसान हे पोरगं कस होईल गं तुला हे प्रबोधनपर गीत सादर केले. योगेश पांचाळ, . अमित बनसोडे, सुशांत माने, ओमकुमार चव्हाण, बालाजी बाबळसुरे, दिक्षा कांबळे, पायल शेवरे, कौसर सन्नाटे आदिंनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन कु. आकांक्षा केरुरे तर आभार कु. सोनाली बनसोडे यांनी मानले. विविध शाखेतील बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो ओळ : गणेश नगर, ता. उमरगा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराप्रसंगी व्याख्याते डॉ. महेश मोटे बोलताना डॉ. सतिश शेळके, डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. शिला स्वामी व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!