ताज्या घडामोडी

श्रमदानातून गावचा विकास करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा…… मदन पाटील

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता.२ (प्रतिनिधी)

देशाला सशक्त करण्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन, ग्रामस्वच्छता, जलव्यवस्थापन या गोष्टींचे संवर्धन करणे आणि राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी श्रमदानातून गावचा विकास करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील यांनी केले. गणेश नगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘ युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास ‘ या शीर्षकाखाली वार्षिक विशेष शिबिराप्रसंगी गुरूवारी (ता. २) रोजी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उषा चव्हाण होत्या. या वेळी उपसरपंच सतिश पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माणिक राठोड, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, माजी सरपंच संजय चव्हाण, विनायक पवार, पोलीस पाटील कलावती चव्हाण, प्रदीप गिरीबा, मुख्याध्यापक सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, संतोष पवार आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मदन पाटील म्हणाले की, सध्या समाजातील नागरिक विविध समस्यांना तोंड देत आहेत. आपला परिसर दुष्काळाच्या छायेत असल्याने पाण्याची बचत करणे, परिसर स्वच्छता, आरोग्याची काळजी घेणे, शारीरिक दृष्टया तंदुरुस्त बनुन मानसिकता सक्षम बनविणे गरजेचे असल्याचे शेवटी ते म्हणाले. मनोगत डॉ. अशोक सपाटे, डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. रविंद्र आळंगे, डॉ. संध्या डांगे, डॉ. महेश मोटे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. विलास खडके, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. शिला स्वामी, प्रा. अजिंक्य राठोड, विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य कांबळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी सोनाली बनसोडे, अमोल कटके, मनोज हावळे, सतिश महिंद्रकर, दिलीप घाटे आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. संध्या डांगे यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते. गणेश नगर, ता. उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उद्घाटन संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कुंडीतील रोपट्यास पाणी घालून करताना मदन पाटील, उषा चव्हाण, अशोक सपाटे, संजय चव्हाण, माणिक राठोड व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!