ताज्या घडामोडी

ना.म.लोखंडे यांचा कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा महत्वाचा. मुख्याधिकारी योगेश पाटील

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांसाठी उभा केलेला लढा महत्त्वाचा होता, असे उदगार शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी काढले. ते शिराळा तालुका कामगार संपर्क कार्यालयात ना.म .लोखंडे यांच्या पुण्यतीथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, ना.म.लोखंडे यांनी ब्रिटिश काळात कामगारांच्या न्याय हक्कांसाठी दिलेला लढा अविस्मरणीय आहे. अशा महान, संयमी आणि अभ्यासू महापुरुषाचा लोकांना विसर पडणे दुर्देवी आहे. प्रा. विजयकुमार जोखे यांनी ना. म. लोखंडे यांनी रविवारच्या सुट्टी आणि इतर सुविधा संदर्भात दिलेल्या योगदानाबद्दल माहिती सांगितली. यावेळी छावा संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राजेंद्र देवकर यांनी शिराळा तालुका कामगार परिषदेच्या कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गणेश यादव यांनी केले. आभार शिराळा तालुका कामगार परिषदेचे अध्यक्ष मारुती रोकडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शिराळा पोलीस ठाण्याचे विनोद पाटील व अभिजित पवार , लोहार कन्स्ट्रक्शनचे प्रमोद लोहार, बापूसो कांबळे,पंकज खोत,शिवाजी कडवेकर,दादासो मोहिते,नगरपंचायत कर्मचारी संजय इंगवले,पप्पू राम कुमावत, विद्युत कर्मचारी कर्मचारी अशोक भोरे,शिवाजी दळवी, अशोक मस्कर, महेश काळे, राकेश वर्मा, शेषराम वर्मा, कैलास वर्मा , सौ.पूनम रोकडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!