आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

औंढोलीत श्रीवाघोबा व श्री जाखमाता देवीचा उत्सव ढोलताशांच्या व टाळमृदूंगाचे तालात संपन्न ..

आखंड हरिनाम सप्ताह १ मे ऐवजी उत्सवाआधी घेण्यात आला. काकडाआरती , भजन , प्रवचन , कीर्तन आणि हरिपाठ असे कार्यक्रम झाले.

Spread the love

औंढोलीत श्रीवाघोबा व श्री जाखमाता देवीचा उत्सव ढोलताशांच्या व टाळमृदूंगाचे तालात संपन्न ..

आवाज न्यूज :लोणावळा ता.१०(प्रतिनिधी ).

औंढोलीत ग्रामदैवत श्रीवाघोबा व श्री जाखमाता देवीचा उत्सव ढोलताशांच्या व टाळमृदूंगाचे तालात संपन्न झाला. आखंड हरिनाम सप्ताह १ मे ऐवजी उत्सवाआधी घेण्यात आला. काकडाआरती , भजन , प्रवचन , कीर्तन आणि हरिपाठ असे कार्यक्रम झाले.

ग्रामदैवत श्री वाघोबा व श्री जाखमाता देवी यांच्या प्रतिमा पालखीत ठेवून प्रथम श्री गणपती व हनुमान मंदिरातून वाजतगाजत ग्रामप्रदक्षिणा साठी रवाना झाली. श्री वेताळमहाराज मार्गावरून ती श्री वाघोबा मंदिरात नेण्यात आली.तेथून देवभेट घेवून पालखी श्री जाखमाता देवी मंदिरात आणण्यात आली. राञी नऊनंतर श्री जाखमाता मंदिर ते ग्रामदैवत श्री वाघोबा व जाखमाता देवीची टाळमृदूंगाचे गजरात ढोलताशांच्या निनादामधे गावातून मिरवणूक काढून श्री हनुमान व गणपतीचे मंदिरात आली.भजन व दुसऱ्या दिवशी पवळेवाडीतील श्रीराम प्रासादिक कला नाट्य मंडळाचे भारूडाचा कार्यक्रम झाला.
उत्सवानिमित्त शिवमंदिरात होणारा सप्ताह श्री छञपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर गावात कार्यक्रम झाले.
पहिल्या दिवशी ह.भ.प.धोंडू सुतार , पाटण यांचे प्रवचन झाले.

 

राञी ह.भ.प.शिंदे महाराज यांचे कीर्तन झाले.
दुसऱ्या दिवशी ह.भ.प. दिलीप महाराज खेंगरे यांचे प्रवचन व राञी ह.भ.प.नेहाताई भोसले यांची कीर्तनसेवा झाली.
तिसऱ्या दिवशी ह.भ.प. बबनमहाराज खेडेकर यांची सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले. .त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांचे हातात बासरी कशी आली , याबाबत आनेक गवळणी चालीत म्हणून दधिची ऋषी च्या आस्थिपासून चार शस्ञे बनवली , त्यात इंद्राचे वज्र , शिवधनुष्य , आदी त्यातील एक तुकडा उरला तो विष्णूला दिला , त्याची बासरी बनली..सरस्वतीने विष्णू प्राप्त व्हावा म्हणून तप केले , पण ती ब्रम्हदेवाची कन्या व त्याची नात आसल्याने तिला बासरीत बस आसे म्हटले आणि तिला आधरी धरी वेणू ,

वेणु कवणाचा गं वाजे ..! ! असे गवळणींना म्हणायला लावले..तीच बासरी ! ! यावेळी मृदूंगमणी श्रीहरी घनवट व संतोषआण्णा घनवट , तसेच गायक ह.भ.प.तुषारमहाराज दळवी , ह.भ.प.प्रविणमहाराज केदारी , संजय महाराज जाधव , संजय महाराज कालेकर , आणि मृदूंगमणी संदिप घारे यांनी साथसंगत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!