ताज्या घडामोडी

कामेरी ता वाळवा येथे 16 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त ” छत्रपती केसरी ” बैलगाडी शर्यतींचे आयोजन

Spread the love

कामेरी ता वाळवा येथे 16 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त ” छत्रपती केसरी ” बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले असल्याची माहिती पैलवान विक्रम पाटील व केशव पाटील यांची माहिती
इस्लामपूर दि 12
(वार्ताहर )कामेरी ता वाळवा येथे शिवजयंती निमित्त छत्रपती केसरी 2023 या ओपन बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले असून तुजारपूर रोड, कामेरी या ठिकाणी
गुरुवार 16 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वा. या स्पर्धा होणार असल्याची माहिती पैलवान विक्रम पाटील व केशव पाटील ( स्वामी) यांनी दिली या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास पै. विक्रम हिंदुराव पाटील यांचे कडून 55,000 रुपये, द्वितीय क्रमांकास
केशव दिनकर पाटील (स्वामी) यांचे कडून 45,000 रुपये, तृतीय क्रमांकास अरविंद पटेल इस्लामपूर यांचे कडून 35,000 रुपये ,चतुर्थ क्रमांकास
अरुण पाटील ढाबा, कामेरी यांचे कडून
25,000 रुपये, पाचव्या क्रमांकास
डॉ. साकेत अनिल पाटील यांचे कडून
15000 रुपये, सहाव्या क्रमांकास
मेहबूब शहाबुद्दीन खान इस्लामपूर यांचेकडून 11,000 रुपये , सातव्या क्रमांकास शशिकांत माळी शिवपुरी व संतोष जगताप यांचेकडून 7,000 रुपये रोख रक्कम व सर्व विजेत्यांना मानाची ढाल बक्षीस दिली जाणार आहे .इच्छुक स्पर्धकांनी शक्तिहार पाटील 9860463104,केशव पाटील . 9503609001, शशिकांत पाटील 7709370420,राहुल मोरे 9766994196,दिपक पाटील 9822209492 कामेरी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकानी केले आहे. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता मैदान सुरु होईल गट, सेमी फायनल चिट्या टाकून होईल.मैदान शासनाच्या नियम व अटींचे पालन करून आयोजित केले आहे.बैलांना मारहाण केल्यास किंवा शासनाने दिलेल्या नियमांचे उलंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!