ताज्या घडामोडी

सैतवडे जयभीमवाडीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Spread the love

जाकादेवी /वार्ताहर:-
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे बलभीमवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,युवकांचे प्रेरणास्थान, सैतवडे बौद्वजन पंचायत समितीचे धडाडीचे कार्यकर्ते ,त्रिशरण फाउंडेशनचे ऑडिटर आयुष्यमान रुपेश रामदास पवार यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे ११ रोजी दुःखद निधन झाले.
दिवंगत रुपेश पवार हे पदवीधर होते. त्यांना धार्मिक ,सामाजिक,शैक्षणिक कार्याची फार मोठी आवड होती. मुंबईत असूनही त्यांचा गावात चांगला संपर्क होता. गावातील अनेक विकास कामात त्यांची त्यांचा मोठा सहभाग असे. रुपेश रामदास पवार हे वकीली क्षेत्राशी संबंधीत होते.कायद्याचे त्यांना चांगले ज्ञान होते. यांचे मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी, वडील, भाऊ,बहीण असा परिवार आहे. रूपेश पवार यांच्या आकस्मिक झालेल्या निधनाबद्दल मुंबईसह सैतवडे बौद्धजन पंचायत तसेच आदर्श महिला मंडळ,त्रिशरण फाउंडेशन या संस्थेतर्फे तीव्र शोक व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!