ताज्या घडामोडी

इस्लामपूर सर्व सेवा सोसायटी व किसान उद्योग समुहाच्या वतीने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांचा सत्कार संपन्न

Spread the love

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल श्री. शैलेश पाटील व श्री. हणमंतराव माळी यांचा येथील इस्लामपूर सर्व सेवा सहकारी सोसायटी व किसान नागरी सहकारी पतसंस्था इस्लामपूर चे वतीने माजी नगरसेवक मा. श्री. अशोकराव देसाई (दादा), यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या समारंभात इस्लामपूर सर्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. सुभाषदादा देसाई, व्हा. चेअरमन श्री. अशोकराव पाटील, किसान नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. सचिन देसाई यांच्या शुभहस्ते कारखान्याचे नुतन संचालक यांचा शाल, फेटा, बुके व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक श्री. बजरंग कदम यांनी केले. यावेळी सोसायटीचे संचालक शंकरराव देसाई, संतोष जाधव, हौसेराव देसाई, जयवंत खंडागळे, हणमंत गुरव, गजानन फल्ले, तानाजी गुणवंत, भिमराव खोत, सिदाप्पा कांबळे, संजय जाधव, सुमन पाटील, सिंधुताई देसाई यांच्या सह किसान नागरी सहकारी पतसंस्था व इस्लामपूर सर्व सेवा सहकारी सोसायटी चे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व आभार सोसायटीचे सचिव श्री. सूभाष कृष्णा जाधव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!