आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भाजपला मोठा धक्का! चिंचवड प्रचाराच्या ऐन धामधुमीत माजी नगरसेवकाने पक्ष सोडला.

अखेर भाजपच्या पिंपरी-चिंचवडमधील नाराज नगरसेवक कामठेंचा राजीनामा.

Spread the love

 राजकीय : भाजपला मोठा धक्का! चिंचवड प्रचाराच्या ऐन धामधुमीत माजी नगरसेवकाने पक्षसोडला……….अखेर भाजपच्या पिंपरी-चिंचवडमधील नाराज नगरसेवक कामठेंचा राजीनामा

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, १५ फेब्रुवारी.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या प्रचाराला नुकताच कुठे जोर धरू लागला असताना. त्यात आज अचानक चिंचवड मतदारसंघातील पक्षाचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी पक्ष सोडल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे, असे बोलले जात आहे.

भाजप सोडल्यानंतरची पुढची भुमिका काय, कुठल्या पक्षात जाणार असे विचारले असता त्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचे कामठे यांनी  सांगितले. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आपल्या संघर्षाला साथ न दिल्याने पक्ष सोडला असल्याचे त्यांनी सांगितले.

२०१७ ला पिंपळे निलखमधून (प्रभाग क्र.२६) ते प्रथमच निवडून आले होते. तेव्हापासून त्यांनी महापालिकेत विविध पातळ्यांवर सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती. त्यासाठी त्यांनी पालिकेत सत्तेत असलेल्या आपल्याच पक्षाला व शहर कारभारी दोन्ही आमदारांना (भोसरीचे महेश लांडगे आणि चिंचवडचे लक्ष्मण जगताप) शिंगावर घेण्याचे धाडस केले होते.

मात्र, त्यांच्या या लढाईला पक्षाने स्थानिकच नाही,तर राज्य पातळीवरूनही पाठिंबा न दिल्याने त्यांनी गेल्यावर्षी नगरसेवकपदाची टर्म संपायला १६ दिवस बाकी असताना २४ फेब्रुवारीला नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.तो देताना त्यांनी पक्षाचे स्थानिक नेते हे ठेकेदार असून त्यांच्या भ्रष्टाचाराला, हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. त्यावेळीच ते पक्ष सोडणार आणि राष्ट्रवादीत जाणार अशी जोरात चर्चा होती. कारण त्यांच्याअगोदर नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेले भाजप नगरसेवक वसंत बोराटे आणि चंदा लोखंडे यांनी हातावर घड्याळ बांधले होते.

मात्र, कामठे हे योग्य वेळेची तथा राजकीय स्थित्यंतराची नेमकी वाट पाहत होते. चिंचवड पोटनिवडणुकीच्या निर्णायक क्षणी त्यांनी भाजपला रामराम ठोकण्याची खेळी केली आहे. त्याचा किती विपरित परिणाम पक्षावर होणार हे २ मार्चला मतमोजणीनंतर दिसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!