आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

श्री गजानन महाराज प्रगट दिनी आळंदीत भाविकांची गर्दी दर्शनासह महाप्रसादास भाविकांच्या रांगा.

संत श्री गजानन महाराज यांचा १४५ वा प्रगट दिन सोहळ्या निमित्त आळंदीतील श्री गजानन महाराज संस्थान मध्ये उत्साहात साजरा..

Spread the love

अध्यात्मिक : श्री गजानन महाराज प्रगट दिनी आळंदीत भाविकांची गर्दी
दर्शनासह महाप्रसादास भाविकांच्या रांगा.

आवाज न्यूज चिंचवड प्रतिनिधी १५ फेब्रुवारी.

संत श्री गजानन महाराज यांचा १४५ वा प्रगट दिन सोहळ्या निमित्त आळंदीतील श्री गजानन महाराज संस्थान मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. अलंकापुरी नगरीतील संस्थान मध्ये धार्मिक परंपरांचे पालन करीत उत्साही भक्तीमय वातावरणात सुमारे २५ हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास रांगा लावून दर्शन घेतले.

 

आळंदी पंचक्रोशीसह पुणे जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने आले होते. मंदिरातील सेवक, व्यवस्थापन यांनी अत्यंत प्रभावी रित्या सेवाभाव जोपासत येथील नियोजन उत्साहात केले. मंदिर परिसरातील मनमोहक, निसर्गरम्य वातावरण, पुष्प सजावट, लक्षवेधी आकर्षक मंदिर बांधकाम यामुळे आळंदीचे वैभवात वाढ झाली आहे.

श्री गजानन महाराज प्रकट दिना निमित्त आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसराला जत्रेचे रूप आले होते. परिसरातील रस्त्यावर भाविकांची गर्दी होती. मात्र मंदिर व्यवस्थापनाचे चोख नियोजन असल्याने कमी वेळेत समाधानकारक दर्शन , ध्यानधारणा शांत मंगलमय वातावरणात भाविकांची झाली. सेवाभावी वृत्तीने सेवकांनी भाविकांना महाप्रसाद वाटपाची सेवा रुजू केली.

सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. प्रगट दिना निमित्त परंपरेने अनेक कार्यक्रमाचे आयोजन, दैनंदिन धार्मिक उपक्रम उत्साहात झाले. श्रींच्या गाभा-यात, मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट लक्षवेधी ठरली. मंदिरातील ध्यानधारणा सभागृहात भाविकानी गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!