आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आरव राजेश शेट्टी यांना ACTIVA 6G हि दुचाकी भेट …

ह्या विद्यार्थ्याला JEE Main 2023 च्या परीक्षेत NTA Score 98.44 असे घवघवीत यश मिळालेले आहे.

Spread the love

आरव राजेश शेट्टी यांना ACTIVA 6G हि दुचाकी भेट..ह्या विद्यार्थ्याला JEE Main 2023 च्या परीक्षेत NTA Score 98.44 असे घवघवीत यश मिळालेले आहे.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १५ फेब्रुवारी.

अग्रवाल विद्या प्रसारक मंडल द्वारा संचलित,गीता विद्यानिकेतन इंग्लिश मीडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ़ आर्ट्स सायंस ॲंड कॉमर्स सोमाटणेफाटा,  मावळ,  तर्फे अग्रवाल विद्या प्रसारक मंडल द्वारा संचलित,ह्या ज्युनिअर कॉलेज मध्ये शिकत असलेला विद्यार्थी, आरव राजेश शेट्टी ह्या विद्यार्थ्याला JEE Main 2023 च्या परीक्षेत NTA Score 98.44 असे घवघवीत यश मिळालेले आहे.

 

त्यानिमित्त शाळेने आरव राजेश शेट्टी यांना ACTIVA 6G हि दुचाकी भेट देऊन त्याचा ह्या यशाचे गौरव व आदर सत्कार करण्यात आला. मॅथेमॅटिकस प्रा. जे. टी. अग्रवाल, Physics प्रा. गीता अग्रवाल, Chemistry प्रा. उदगिरे सराने , दिलेले ट्रिकस (techniques) चा भरपूर उपयोग झाला.

या यशात त्याच्या शिक्षकांचा बहुमूल्य वाटा असल्याचे व ह्या कॉलेज च्या शिक्षकां सारखे शिकवणारे शिक्षक असतील तर यश नक्कीच मिळते, तसेच JEE Advance crack करून IIT मधून कॉम्प्युटर इंजिनीरिंग करणार असल्याचे आरव राजेश शेट्टी यांनी. आपल्या मनोगतात सांगितले.

तसेच डॉ. ह्रिषीकेश शिंदे MBBS , डॉ. श्वेता मित्तल BDS , डॉ अमिषा अग्रवाल BDS , डॉ. रितिक राठोड MBBS , कुशल अग्रवाल JEE2022 Topper NTA Score 96 व MHT -CET 99 .74 , कुन्जल अग्रवाल JEE 2020 Topper NTA Score 91 व MHT CET 98 .42, कशिश गोयल ह्या काही माजी विद्यार्थ्यांचा चांदी चे नाणे व श्रीफळ देऊन आदर सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक व संचालक प्रा. जे. टी. अग्रवाल यांनी सांगितले की, गीता विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज ची १२वी सायंस ची ५वी batch परीक्षे ला जाणार आहे. ह्यापूर्वी च्या ४ batches चा १००% निकाल लागलेला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय हुशार असतात पण योग्य मार्गदर्शना अभावी स्पर्धात्मक परीक्षेत मागे पडतात अशी खंत सुद्धा प्रा. जे. टी. अग्रवाल यांनी व्यक्त केली. ह्या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड अग्रवाल समाज चे अध्यक्ष सुनील रामेश्वरदास अग्रवाल, निर्माण ग्रुप व राजेश सुरेंद्र अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!