ताज्या घडामोडी

आटपाडी येथे संत निरंकारी सत्संग भवनचा उद्घाटन सोहळा उत्साहात

Spread the love

प्रतिनिधी ~सौ.मंजुषा पवार.

संत निरंकारी मंडळ शाखा आटपाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सत्संग भवन इमारतीचा उद्घाटन सोहळा निरंकारी मंडळाचे आदरणीय महात्मा सुखदेव सिंहजी ( मेंबर इंचार्ज & जनरल सेक्रेटरी स.नि. म.दिल्ली ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी आयोजित विशाल सत्संग सोहळ्यामध्ये महात्मा म्हणाले की, सत्संग भवनाची आपण सर्वांनी कद्र केली पाहिजे सत्संग भवन मध्येच मानवालाच खऱ्या ईश्वराची ओळख करून दिली जाते आणि मानवतेची शिकवण दिली जाते सत्संग ही अशी गंगा आहे यामध्ये जो डुबकी मारतो खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाचा उद्धार होतो , या सत्संगचा महिमा नाही आत्म सुखाला सीमा , सत्संगमुळे मनुष्याला परमानंदाची प्राप्ती होते सदगुरु ने आपल्याला पुर्ण परमात्म्याशी जोडलेले आहे व हा परमात्मा आपल्या अंग संग आहे याची जाणीव निरंतर रहावी , आपणास नेहमी सत्संग घडावी निरंकार परमात्म्याचे एकत्रित येऊन यशोगान करता याव म्हणुन सत्संग भवनची निर्मिती केली आहे तरी सर्वानी नियमित सत्संग केली पाहिजे समयाच्या सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज ह्या ब्रह्मज्ञाना द्वारे जगामध्ये विश्वबंधुत्व निर्माण करण्याचे महान कार्य करीत आहेत त्याची शिकवण आपल्या जीवनामध्ये धारण करून आपण आपले जिवन सुखमय करावे*
*सद्गुरू भेटले म्हणून निरंकार समजला आहे तर ज्ञान घेण्याच्या अगोदर पण तो जवळ होता पण बोट आकाशामध्ये दाखवत होतो पण सद्गुरूने कृपा केली व या देवाचा पत्ता सापडला म्हणूनच सद्गुरु हा देवा पेक्षा मोठा आहे.
आमच्या जीवनामध्ये सद्गुरू आला व आम्हाला ईश्वराची ओळख होऊन आम्ही सुखी झालो आता आमच्यावरती जबाबदारी आहे की ही ज्ञानगंगा घरोघरी पोहचवून सर्वाना या सत्संग भवन मध्ये आणण्याची व सकळांना सुखी करायचे आहे.यावेळी कोल्हापूर झोनचे झोनल इंचार्ज अमरलाल निरंकारी यांनी नवीन भवन इमारत झाले बद्दल आटपाडी येथील संत महात्माना व बेहेनजींना शुभेच्छा दिल्या यावेळी सेवादल विभागाचे क्षेत्रिय संचालक जगन्नाथ निकाळजे याचेसह कोल्हापूर झोनमधील रमेशलाल वाधवाणी व खानापूर सेक्टरच्या सर्व ब्रांचेस मधून हजारोच्या संख्येने संत महात्मा भाविक भक्त उपस्थित होते यावेळी आटपाडी गावातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंच संचलन समीर रोहीडा यांनी केले आभार नाईकनवरे सर यांनी मानले सत्कार अमरलाल निरंकारी , दत्तात्रय जगताप, पांडुरंग नाईकनवरे सर यांनी केला कार्यक्रमाचे नियोजन आटपाडी शाखेचे मुखी पांडुरंग नाईकनवरे सर यांचे मार्गदर्शनाखाली सेवादल संत महापुरुष यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!