ताज्या घडामोडी

बहिरेवाडीमधे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

शिवजयंतीनिमत्त 101 नागरिकांचं रक्तदान

शिवजयंतीनिमत्त बहिरेवाडी गावामधे भैरोबा तालीम मंडळाच्या वतीने 101रक्तदान घेण्यात आले.
“चला माणुसकी जपूया,रक्तदान करुन जीवदान देऊया” या विचारधारेने प्रवृत्त होऊन शिवजयंती या पवित्र दिनी पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावामधे दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित केलं जातं.या शिबीरामधे दरवर्षी शंभर च्या वरती रक्तदान केलं जातं.या रक्तदानामधून मिळणार्या कार्डचा उपयोग गरोदर माता,अपघातग्रस्त रुग्ण,ऑपरेशन करावे लागणारे रुग्ण यांना रक्त उपलब्ध करण्यासाठी होतो.”रक्तदात्यांचं गाव” म्हणून बहिरेवाडी गावाला संपूर्ण महाराष्ट्रामधे ओळखलं जातं.
रक्ताला कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान केल्यानेच रुग्णाचा जीव वाचू शकतो,त्यामुळे समाजातील सुज्ञान नागरिकांनी ज्यास्तीत ज्यास्त रक्तदान करण्याचं आवाहन रक्तदान प्रबोधन चळवळीचे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी केले.
या शिबिरामधे एकून 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन मिरज शासकीय रक्तपेढीचे डॉ.शेंडगे आणि बहिरेवाडी गावचे माजी सरपंच श्री.शिरीषकुमार जाधव यांचे हस्ते करण्यात आले.मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने हे रक्तदान घेण्यात आले.
सायंकाळी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीचे उद्घाटन युवा नेते मा.श्री.विश्वेश कोरे यांनी केले.
यावेळी बहिरेवाडी गावचे माजी सरपंच मा.श्री.शिरीषकुमार जाधव,भैरोबा तालीम मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रविण जाधव,मयुर जाधव,उपाध्यक्ष स्वप्निल काशीद,बहिरेवाडी ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रदिप चव्हाण,105 वेळा विक्रमी रक्तदान केलेले श्री.वसंत चव्हाण भैरोबा तालीम मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!