ताज्या घडामोडी

हरवलो मी… या गजल अल्बमच्या निमित्ताने अभिनेते जगदीश वाळोकर यांची दमदार एंट्री

Spread the love

बुलढाणा/राजेश चौकेकर : सध्या चर्चेत असलेले नाव म्हणजे जगदीश शेषराव वाळोकर मूळगाव मु. सावरखेड खुर्द पो. ईसोली ता.चिखली, जि.बुलढाणा हे लहानशे खेडेगाव आहे. इथूनच त्यांची जन्म भूमी ते कर्मभूमी असा सुरू झालेला प्रवास ,परंतु व्यवसायानिमित्त ते मेहकर जि. बुलढाणा येथे स्थायिक झाले.तशी अभिनयाची ओळख आणि आवड सुध्दा त्यांना शालेय जीवनापासूनच होती मग ते शालेय जीवनातील स्टेज शो असो किंवा नाटक या सर्वात दहावीपर्यंत भाग घेत राहिले. मग नंतर महाविद्यालयीन शिक्षण शिकताना एमबीए केलं त्यानंतर बिजनेस मध्ये आले आणि मे. जगदीश डिस्ट्रीब्युटर्स (इलेक्ट्रॉनिक्स & फर्निचर) म्हणून त्यांचं स्वतःचं शॉप असून त्याच ठिकाणी त्यांनी व्यवसाय सुरू केला. आज ते मेहकर तालुक्यातील यशस्वी बिझनेसमन मध्ये ओळखले जातात.बुलढाणा जिल्ह्यामध्ये लघुपट चित्रपट अल्बम सॉंग असे फारसे होत नव्हते. तरीही त्यांचे मित्र विजय फंगाळ सर यांनी दोन वर्षे आधी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात यशस्वी कंचणी लघुपट तो म्हणजे मेहकर शहरातील असलेल्या पुरातन कंचनीचा महाल त्यावर तयार केला.मूळतः त्यांनी या लघुपटात भूमिका देऊ केली होती. त्यानंतर ईपीक पाहणी याही लघुपटात त्यांनी भूमिका देऊ केली होती. परंतु त्यांना व्यवसायामुळे जाता नाही आले,मुळातच आवड असल्याने मागे थांबणे शक्य नव्हते. त्यांनी शेवटी त्यांच्या आगामी म्हणजे दिवाळी 2023 मध्ये येणाऱ्या यंग्रटवाडी या चित्रपटासाठी भूमिका दिली परंतु ,त्याआधी एका अल्बम सॉंग जे आता बुलढाणा जिल्ह्यातील पहिले मराठी गझल अल्बम सॉंग “हरवलो मी…” राहील त्यासाठी त्यांची निवड करून संधी दिली आणि येणाऱ्या काळात गझल प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. गेल्या 12 फेब्रुवारीला या गझलचे शूटिंग हिवरा आश्रम, देऊळगाव माळी, जिल्हा बुलडाणा, चोंडी तालुका पातुर जिल्हा अकोला येथे पार पडले असून लवकरच प्रेक्षकांचे भेटीस येणार आहे.
नेहमीच सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असनारे मेहकर तालुक्यातील गौंढाळा येथे पैनगंगेच्या तिरावर योगेश्वर भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले.
तिथेच भव्य मंदिर गौंढाळा येथे बांधून घेण्यास त्यांचा पुढाकार होता, येथे दरवर्षी प्रगट दिनाचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्या उत्सव समितीचे अध्यक्ष पद त्यांना देण्यात आले आहे.त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!