ताज्या घडामोडी

जाकादेवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

जाकादेवी/ वार्ताहर:-
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,थोर आदर्श राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.बिपीन परकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री.राहुल यादव यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्याचा आढावा घेत छत्रपती शिवरायांचे अनेक प्रसंग कथन करून मुलांना बहुमोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय विचार मांडताना मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी शिवरायांचे मोठेपण सांगताना शिवरायांच्या आईचा उल्लेख करून शिवरायांवर झालेले जिजाऊ मातेचे संस्कार अधोरेखित केले.शिवरायांच्या गुणांचे अनुकरण करून विद्यार्थ्यांनी वाटचाल केल्यास आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून बिपीन परकर यांनी भाषण करणाऱ्या व प्रभावीपणे गीतगायन केलेल्या विद्यार्थ्यांचे समारंभात पुष्प देऊन खास कौतुक केले.
यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थीनींनी शिवरायांचे पाळणा गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी पुष्पहार समर्पित केला .यावेळी शाळेचे पर्यवेक्षक श्री.शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री.संतोष पवार,प्रमुख वक्ते इतिहास विषयाचे अभ्यासक राहुल यादव, शिक्षक प्रतिनिधी श्री.संदीप कुराडे, सांस्कृतिक विभागाचे श्री.अरुण कांबळे, परीक्षा विभाग प्रमुख श्री.योगेश चव्हाण श्री.संतोष सनगरे, मंदार रसाळ, संदेश सोनवडकर, अवधूत जाधव यांसह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!