ताज्या घडामोडी

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनीची गरुडझेप

Spread the love

परळी (प्रतिनिधी)

भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन चे “डॉ.एपीजे अब्दुल कलाम सॅटॅलाइट लॉन्च व्हिकल मिशन 2023” च्या माध्यमातून कलाम कुटुंबीय कलाम सर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी हे मिशन जगातील सर्वात मोठे भारतीय मिशन असून याद्वारे विद्यार्थ्यांनी 150 पिको उपग्रह बनवले असून ते परत वापरता येणाऱ्या रॉकेट च्या साह्याने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती चे औचित्य साधून दिनांक 19/02/2023 ला पुदुच्चेरी, चेन्नई येथे राज्यपाल श्रीमती डॉ.तमिलीसाई सौंदराराजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमास स्पेस झोन इंडियाचे तरुण शास्त्रज्ञ श्री आनंद मेघालिंगम, मार्टिन ग्रुपचे प्रमुख जोसेफ , महाराष्ट्राचे राज्य समन्वयक श्री मिलिंद चौधरी व भारतातील अनेक मान्यवर शास्त्रज्ञ व्यासपीठावर उपस्थित होते . या अभूतपूर्व कार्यक्रमास बीड जिल्ह्यातून दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल ,परळी वैजनाथ ची विद्यार्थिनी कु.सेजल चंद्रकांत गायकवाड (वर्ग 8 वी ) ने सहभाग नोंदविला .महाराष्ट्रात दिनांक 20 जाने 2023 रोजी पुणे ,22 जानेवारी रोजी परभणी, व 23 जानेवारी रोजी नागपूर येथे या उपग्रह बांधणीच्या प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाल्या होत्या. परभणी येथील झालेल्या कार्यशाळेत दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची कु.सेजल गायकवाड ने सहभाग नोंदविला होता. अशा विविध कार्यशाळेतून मिरीट मध्ये आलेले भारतातील फक्त शंभर विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन रॉकेटची बांधणी करतील असे नियोजन होते. या रॉकेट बांधणीच्या कार्यक्रमास कु. सेजल गायकवाड ने ऐतिहासिक सहभाग नोंदविला. चेन्नई येथे कार्यक्रमास सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ,आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, ए.के.आय. एफ ,अशी पाच प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. अशा कार्यक्रमातूनच भारतीय विद्यार्थी अवकाश क्षेत्रात भारताचे नाव अभिमानाने नोंदवतील.
या घवघवीत यशाचे श्रेय कु. सेजल गायकवाड हिने आपले पालक, विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ उषा किरण गित्ते, सदैव परळीकरांसाठी प्रेरणास्थान असणारे व प्रोत्साहन देणारे आदरणीय श्री किरण गित्ते साहेब, शाळेचे प्रिन्सिपल श्री विठ्ठल तुपे सर, विज्ञान विषय शिक्षक व वर्गशिक्षक यांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!