आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

शिवदुर्गने व्हि.पी.एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दिले साहसाचे धडे.

व्हिपीएस च्या प्राचार्या. गाणू मॅडम यांच्या संकल्पनेतून एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवदुर्गचे विवीध विभागांमध्ये चालणारे कार्य व त्यामध्ये असणाऱ्या करिअर संबधीत संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले.

Spread the love

शिवदुर्गने व्हि.पी.एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दिले साहसाचे धडे.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २१ फेब्रुवारी.

व्हिपीएस च्या प्राचार्या. गाणू मॅडम यांच्या संकल्पनेतून एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवदुर्गचे विवीध विभागांमध्ये चालणारे कार्य व त्यामध्ये असणाऱ्या करिअर संबधीत संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
गानू मॅडम यांनी प्रास्ताविक केले . आनंद गावडे सर यांनी सर्व शिवदुर्गच्या सदस्यांची ओळख करुन दिली. शिवदुर्गचा सर्वांच्या वतीने उपाध्यक्ष महेश मसने यांनी सत्कार स्विकारला . शिवदुर्गच्या रेस्कु विषयीची फिल्म दाखवण्यात आली. शिवदुर्ग संस्था स्थापनेपासून संस्थेची वाटचाल व शिवदुर्ग क्लायबींग , शिवदुर्ग रेस्कु, शिवदुर्ग ॲनिमल, शिवदुर्ग सायकलींग , शिवदुर्ग फिटनेस, शिवदुर्ग सांस्कृतिक विभाग असे सहा विभागात काम कसे चालते याची माहिती देण्यात आली.

आर्टिफिशियल वॉल क्लायबींग हा खेळ ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यादृष्टीने शिवदुर्ग मुला मुलींची तयारी करीत आहेत. तसेच अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होता येते. अनेक कोर्सेस करता येतात. करियर करण्यासाठी हा पण एक पर्याय असु शकतो.

 

वेटलिफ्टींग पावरलीफ्टींग तसेच सायकलींग या खेळातही विद्यार्थ्यांना संधी आहेत. ॲनिमल ट्रिटमेंट करणे, सांस्कृतिक विभागात नृत्य कला या मध्ये कलाकारांना संधी आहे
रेस्कु विषयक फिल्म , क्लायबींग फिल्म दाखवून मुलांना आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला.
तसेच हायलाईन व रॅपलींग सारख्या साहस क्रिडा प्रकारांचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

या सर्वांचा उद्देश असा होता कि सामाजिक बांधिलकी निर्माण होणे, मुलांच्या हातातील मोबाईल दुर गेला पाहिजे. व मुले मैदानात आली पाहिजे. हि शक्ती योग्य दिशेने लागली तर शाळेचे व लोणावळ्याचे नाव हि मुले नक्कीच  रोशन करतील.

 

इयत्ता दहावीची कु. तन्वी आहेर हिने रॅपलींगचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. ओम हरसुले व आयुष वर्तक याने हायलाईनचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.गानू मॅडम – प्राचार्या ,
महेंद्रकर सर उपमुख्याध्यापक , रसाळ सर – पर्यवेक्षक,  जोशी सर ,कुलकर्णी सर ,  गिरमकर सर
चोणगे सर , दहिफळे सर सुर्यवंशी सर, म्हात्रे , रत्नाकर ,  कदम सेवक,
शिवदुर्ग चे महेश मसने उपाध्यक्ष, सुनिल गायकवाड सचिव, आनंद गावडे सह सचिव, अनिल सुतार संचालक, सचिन गायकवाड जेष्ठ गिर्यारोहक, समिर जोशी, ओंकार पडवळ, ओम हरसुले, आयुष वर्तक, आदित्य पिलाने, हर्ष तोंडे,सिध्देश निसाळ, दुर्वेश साठे, अजय शेलार, निकीत म्हाळसकर, यश सोनावणे या सदस्यांनी सहभाग घेतला, या सर्वांचे
आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!