ताज्या घडामोडी

लादेवाडी दत्त मंदिर येथे उद्या महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

लादेवाडी ता,शिराळा येथे स्वस्तिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि माविम सांगली अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (ता.२२) रोजी दत्त मंदिर येथे सकाळी ११ वाजता महिलांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात रक्तक्षय (ॲनिमिया) निदान व उपचार करून महिलांना आरोग्या विषयी डॉ. निशा प्रकाश पाटील ह्या मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच वैशाली खोत, उपसरपंच कृष्णात खामकर, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन भाग्योदय लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका संगीता स्वामी, संयोगिता उषा शेवडे, बचत गटाच्या अध्यक्षा माधुरी माने, जयश्री खोत, अश्विनी खामकर, संगीता मोरे, विद्या खोत, स्वस्तिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे तुषार भोसले, अक्षय चौगुले,तेजस्विनी पवार, यास्मिन मुल्ला,प्रतीक्षा शिवजातक,पूनम साठे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!