ताज्या घडामोडी

कापरी येथे वाकुर्डे बुद्रुक योजना पाणी पूजन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – कापरी (ता. शिराळा)

वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कापरी ओढ्यातुन तलावात चाचणी स्तरावर सोडण्यात आले. या पाण्याचे पूजन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, सहाय्यक अभियंता दीपक परळे, उप विभागीय अभियंता अमोल कमलाकर, जेष्ठ कार्यकर्ते पंढरीनाथ पाटील, माजी सरपंच मोहन पाटील, बाजीराव पाटील, सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, माजी अध्यक्ष शिवाजी पाटील, उत्तम निकम, महेश पाटील, मानसिंग पाटील, महादेव खबाले तसेच शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!