ताज्या घडामोडी

शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे ता. रत्नागिरी संचलित न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा शुभेच्छा समारंभ संपन्न.

Spread the love

शनिवार दिनांक 25/02/2023 रोजी सकाळी ठिक 9.30 वाजता न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे ता. रत्नागिरीचे उपाध्यक्ष मा.अ.अजिज इस्माईल मुकादम साहेब हे होते. श्री. अ. वहाब फकिर महंमद खलपे खजिनदार शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे ता. रत्नागिरी लियाकत शेकासन, मा. श्री. जावेद उस्मान काझी मा. श्री. मुझफ्फर अ. रज्जाक सय्यद व इमान अ. कादिर चिकटे इत्यादी सदस्य, माजी पोलीसपाटील सैतवडे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. इब्राहिम मुल्ला साहेब, मुख्याध्यापक – श्री. अंगद रस्तुम मुठाळ व स्टाफ आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.

इयत्ता 10 वी च्या विद्यार्थीनीनी सुस्वर स्वरात गायलेल्या स्वागत पद्याने उपस्थितांची मने जिंकून घेतली. मुख्याध्यापक श्री. अंगद रस्तुम मुठाळ यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांनी आपली शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. श्री. उस्मान काझी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना स्वतःचे उज्ज्वल करिअर करण्यासाठी खूप मेहनत घ्या असे सूचित केले. संस्था अध्यक्ष मा. सज्जाद अ करीम सय्यद, संस्था सचिव मा. समीर अ रज्जाक सय्यद व सदस्य मा. गनी दळवी, रफिक मुल्ला व समिउद्दिन माद्रे यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.शिक्षक वृंदाकडून श्रीमती सायली शिर्के मडम, नितीन जाधव सर, संतोष चव्हाण सर, नशिम शेकासन मडम यांनी विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सुत्रनिवेदन इयत्ता 10 वीच्या विद्यार्थीनी कुमारी समृद्धी नरेंद्र जाधव, चंदना वैभव साईलकर व मरयम अल्लाउद्दिन गवरे यांनी केले. संगितसाथ हार्मोनियम- कुमारी समृद्धी नरेंद्र जाधव, ढोलकी – कुमार साहिल सुनिल निंबरे व तालवाद्य कुमार दक्ष चिंतामणी धातकर, ध्वनि – व्यवस्था – कुमार ओजस राजेश शिंदे, फोटोग्राफी – कुमार विनीत विनोद बैकर व संपूर्ण सजावट आणि रोषणाई इ. सर्व इयत्ता 10 वीचे विद्यार्थी यांनी केले. आभार कुमारी मरयम अल्लाउद्दिन गवरे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. रमेश गंधेरे सर, श्री. फय्याज भाटकर, श्री. मकरंद पवार सर, सौ. वैभवी वैभव साईलकर दिया विनोद साईलकर व मनिषा मनोहर बुरंबाडकर, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!