ताज्या घडामोडी

संकल्प फाउंडेशनच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता दूत म्हणून सन्मानित

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
संकल्प फाउंडेशनने संत गाडगेबाबा यांची जयंती शिराळा नगरपंचायतीच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना गाडगेबाबांचे स्वच्छता दूत म्हणून सन्मानित करून साजरी केली. याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे प्रतिपादन अनिसचे जिल्हा अध्यक्ष विजयकुमार जोखे यांनी केले.
शिराळा येथे संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन येथे संकल्प फाउंडेशनच्यावतीने सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोजित सन्मान सोहळ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी यादव होते. संत गाडगे महाराज पतसंस्थेचे संचालक रमेश यादव,फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्व सफाई कर्मचाऱ्याना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिराळा तालुका कामगार परिषदेचे अध्यक्ष मारुती रोकडे, कैलास देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक गणेश यादव यांनी केले. यावेळी फाउंडेशनचे सचिव महादेव परिट, खजिनदार अविनाश यादव, संचालक सुभाष दळवी, सुयोग यादव, वैभव तेली, शिवाजीराव चौगुले, रविंद्र यादव, जितेंद्र गायकवाड,विजय कांबळे, व नगरपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते. आभार रवी यादव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!