ताज्या घडामोडी

संत गाडगेबाबा अभियानात पुणे विभागात ग्रामपंचायत चिखली प्रथम

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत ग्रामपंचायत चिखलीने उत्कृष्ट कामगिरी करत पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चिखली ग्रामपंचायतच्या या उत्कृष्ट यशाबद्दल शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी चिखली ग्रामपंचायतचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व समूह समन्वयक यांचे अभिनंदन केले आहे.
याबाबत माहिती देताना शिराळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले की, दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात येते. या अभियानात ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घेऊन गावाच्या स्वच्छतेसाठी व विकासासाठी प्रयत्न करावेत या हेतूने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेसाठी स्वच्छतेचे विविध निकष लावण्यात येतात. या निकषांमध्ये गावातील पाण्याची गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचे व्यवस्थापन, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच घर, गाव व परिसर स्वच्छता, नागरिकांची वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छतेमध्ये लोकांचा सहभाग व स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या विविध निकषांच्या आधारे गुणांकन केले जाते आणि सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या प्रथम तीन ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी केली जाते. यामध्ये सरस कामगिरी करत चिखलीने पुणे विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त (विकास) विजय मुळीक यांनी चिखली येथे समक्ष भेट देऊन सर्व निकषांची पडताळणी केली व त्यानंतर चिखली ग्रामपंचायत ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले आहे. चिखली सोबतच ग्रामपंचायत कुंडल तालुका पलूसला सुद्धा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले आहे.

सदर स्पर्धेत भाग घेऊन सर्व निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी चिखलीचे तत्कालीन सरपंच राजेंद्र नाईक, ग्रामसेवक अशोक सोनवणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी उत्कृष्ट प्रयत्न केले. तसेच शिराळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मनोज जाधव, रविंद्र मटकरी, प्रकाश शिंदे तसेच स्वच्छ भारत मिशन कक्षातील समूह समन्वयक कल्याणी पाटील, मनिषा पाटील, राणी तांबवेकर यांनी ग्रामपंचायत ला मार्गदर्शन करून स्पर्धेची सर्व तयारी उत्तमरित्या केली. त्यांच्या या यशाबद्दल सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय जाधव व शिराळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष राऊत यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!